आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mamata Banerjee Attacks BJP, Says Fight Against Politics Of Hatred And Communalism

ममता बॅनर्जी यांचे विरोधी पक्षांना खुले आव्हान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तृणमूल पक्षाचे चिन्ह चेहऱ्यावर रंगवून हुतात्मादिनी आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेला कार्यकर्ता. - Divya Marathi
तृणमूल पक्षाचे चिन्ह चेहऱ्यावर रंगवून हुतात्मादिनी आयोजित कार्यक्रमात सहभागी झालेला कार्यकर्ता.
कोलकत्ता- पश्चिम बंगालात वर्ष २०१६ मधे विधानसभा निवडणुका होणार आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसला एकहाती सत्ता मिळेल, असा दावा केला आहे.
भाजप, काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष एकत्र आले तरीही तृणमूल काँग्रेसलाच निर्भेळ बहुमत मिळेल, असा दावा ममतांनी केला आहे. हुतात्मा दिवसानिमित्त कोलकात्यात आयोजित रॅलीत ममता बोलत होत्या. भाजप, काँग्रेस आणि सीपीएम हे पक्ष विचारशून्य असल्याचा आरोप ममतांनी केला. त्यांना पश्चिम बंगालच्या जनमताचा कौल मिळणे शक्य नसल्याचे सांगून विकासासाठी तृणमूललाच जनाधार मिळेल, असा दावा त्यांनी केला.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, हुतात्मा दिनानिमित्त कोलकात्यात उसळला जनसागर

बातम्या आणखी आहेत...