आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ममता बॅनर्जींच्या आदेशाशिवाय मंत्री लग्नही करू शकत नाहीत'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता- पश्चिम बंगाल मंत्रिमडळातील सगळे मंत्री निव्वळ शेळ्या आहेत.ममता बॅनर्जीच्या आदेशाशिवाय ते लग्नही करू शकत नाही अशा शेलक्या शब्दात माकपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनिसुर रहमान यांनी टीका केली आहे. ममता आणि त्यांच्या सहकार्‍यांविरोधात अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल रहमान यांना उद्या सोमवारी हक्कभंगाची नोटीस पाठवण्यात येणार आहे.

बिरभुम येथील जाहीर सभेत रहमान यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे तृणमूल काँग्रेस भडकली आहे.यापूर्वीही रहमान यांनी ममतांविरोधात अत्यंत खालच्या पातळीवरून टीका केली होती. शनिवारी रहमान यांचा जाहीर सभेत पुन्हा तोल सुटला. माकपच्या सरकारमध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदही भूषविले आहे.सन 2012 च्या डिसेंबर महिन्यात ममता सरकारने अत्याचार पीडित महिलांना 20 हजार रुपयांची मदत जाहीर केली होती.त्यावेळी ममतांवर असा प्रसंग गुदरल्यास तुम्हाला काय मदत द्यावी लागेल,असा असभ्य सवाल रहमान यांनी केला होता. दरम्यान, राज्याचे विधिमंडळ कामकाज मंत्री पार्थ चॅटर्जी यांनी रहमान यांना हक्कभंगाची नोटीस बजावणार असल्याचे सांगितले.