आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ममतादीदी चावडीवर; घरात असेल ते द्या, मुरमुरे-चहासुद्धा चालेल !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झारग्राम - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जेवढ्या राजकारणी तेवढ्याच मनस्वी व्यक्ती. म्हणूनच त्यांनी अलीकडे एका दुर्गम खेड्याला भेट दिली तेव्हा ग्रामस्थांच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. घरात जे असेल, ते द्या. मुरी (मुरमुरे) द्या, असे म्हणत ममतांनी मुरमुरे खाल्ले आणि साधा चहादेखील घेतला !


पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील गोपीनाथपूर हे अत्यंत दुर्गम भागातील खेडे आहे. आमदार-मंत्री येण्याचे टाळतात त्या भागात मुख्यमंत्री आल्याने गावक-यांना सुखद धक्का बसला. एका कुटुंबात त्यांना पाहुणचारासाठी दूध घेता का, अशी विचारणा झाली. तेव्हा त्यांनी नकार दिला. परिस्थिती जेमतेम असल्याचे त्यांनी ओळखले. त्या लगेच म्हणाल्या, मला काहीही चालेल. अगदी मुरीदेखील. मला मुरी व चहा द्या. त्यानुसार पाहुणचार झाला. त्यानंतर त्यांनी गावक-यांची चावडीवर भेट घेतली. इंदिरा आवास योजनेचा लाभ मिळाला आहे का, याबद्दलची माहिती जाणून घेतली. तेव्हा गावातील लोक वंचित असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर प्रशासनाला गतिमान करणा-या सूचना त्यांनी दिल्या. दारिद्र्यरेषेखालील लोकांना त्यांनी 100 दिवसांच्या रोजगाराच्या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले. बॅनर्जी चळवळीतील असल्या तरी आता त्या राज्याच्या मुख्यमंत्री आहेत. त्यांचे राहणीमान किंवा दृष्टिकोन बदलेला दिसत नाही. म्हणूनच त्यांनी पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील गोपीनाथपूरला गुरुवारी भेट दिली . काय होता उद्देश ?


ममता बॅनर्जी यांनी गोपीनाथपूरच्या भेटीत आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या कुटुंबाची आस्थेने विचारपूस केली. त्यात त्यांनी मध्यान्ह भोजन मिळते का ? तो मुलांचा हक्क आहे. तुला खाण्यास अंडी मिळतात का ? असे प्रश्न त्यांनी मुलाला विचारले. मूल गप्प होते. त्यावर ममतांनी सोबतच्या अधिका-यांना त्यात लक्ष घालण्याची सूचना केली. एकूणच योजनांची योग्य अंमलबजावणी होते का, याची प्रत्यक्ष पाहणी आणि त्याला प्रभावी करण्यासाठी त्यांनी हा दौरा केल्याचे दिसून येते.