आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ममतांच्या ‘भाजप भारत छोडो’ मोहिमेला सुरुवात, भाजपने लोकशाहीला बदनाम केल्याचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेदिनीपूर- भाजप भारत छोडो २०१९ अशी घोषणा देत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील सत्ताधारी पक्षाला लक्ष्य केले. भाजपने लोकशाहीला बदनाम केले आहे, असा आरोप ममतांनी केला.  

बुधवारी ममतांनी सत्ताधारी भाजपच्या विरोधात आंदोलनाला सुरुवात केली. केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने सामान्य नागरिकांच्या अधिकारांवर गदा आणली आहे. धर्मनिरपेक्षतेला धोका निर्माण झाला आहे. एवढेच नव्हे तर देशाचे विभाजनही झाले. ही गोष्ट आम्ही कदापिही होऊ देणार नाही. २०१९ च्या निवडणुकीत भाजपने भारत सोडावा हीच घोषणा राहणार आहे. आम्ही इतर सर्व विरोधी पक्षांच्या सहकार्याने भाजपला सत्तेवरून खाली खेचण्याचे काम करणार आहोत. त्यासाठी विरोधकांची एकजूट पाहायला मिळेल. समाजातील जातीयवाद आणि तिरस्काराची भावना नष्ट करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे त्या म्हणाल्या.  केंद्र सरकार सक्तवसुली संचालनालय, आयकर विभाग आणि सीबीआय यांच्यामार्फत आमच्यावर दबाव टाकू शकत नाही. राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव याच महिन्यात जाहीर सभा घेणार आहेत. त्या सभेला मी उपस्थित राहणार आहे, असे बॅनर्जी म्हणाल्या. 
बातम्या आणखी आहेत...