आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेअरनेस सोपची जाहिरात साऊथ सुपरस्टारच्या अंगलट, मिळाली कोर्टाची नोटीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वायनाड (केरळ) - दक्षिण भारतातील सुपरस्टार मामुटी गोरे करणाऱ्या साबणाची जाहिरात करुन कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे. केरळच्या एका कलाकाराने इंदूलेखा व्हाइट सोप तयार करणाऱ्या कंपनीविरोधात ग्राहक मंचात तक्रार दाखल केली आहे. मामुटी या सोपची जाहिरात करतो.
आज कोर्टात हजर व्हावे लागेल
फेअरनेस सोप तयार करणारी कंपनी आणि त्याची जाहिरात करणारा कलाकार मामुटीला मंगळवारी वायनाडच्या ग्राहक मंचाच्या कोर्टात हजर राहाण्याचे आदेश आहेत. मामुटीच्या वकिलाने मात्र अजून आमच्यापर्यंत नोटीस आली नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी 12 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
मामुटी आणि इंदूलेखा फेअरनेस सोप निर्मीती करणाऱ्या कंपनीविरोधात तक्रार दाखल करणारे के. चाथू यांचे म्हणणे आहे, की मी एक वर्षांपासून इंदूलेखा सोप वापरत आहे मात्र अजून गोरा झाला नाही. मोठ-मोठे चित्रपट हिरो कोणताही विचार न करता अशा उत्पादनांची जाहिरात करतात, यामुळे सर्वसामान्यांची फसवणूक होते. हे बंद झाले पाहिजे.
मामुटी काय म्हणाला
मामुटीच्या वकीलाने म्हटले आहे, 'या प्रकरणात मामुटीला नाहक ओढले जात आहे. स्क्रिप्ट रायटरने जे लिहून दिले ते त्याने फक्त कॅमेऱ्या समोर सांगितले आहे. एवढेच त्याचे काम आहे.'
जाहिरातीमध्ये काय आहे
मामुटी हा केवळ साउथचा सुपरस्टार नाही तर तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा मोठा कलाकार आहे. इंदूलेखा सोप यूज केल्यानंतर तुमची त्वचा गोरी आणि तजेलदार दिसेल असे तो या जाहिरातीत म्हणतो.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, कोण-कोणते कलाकार जाहिरातींमुळे अडकले वादात