आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पित्याने मुलीवर बलात्कार करुन केली हत्या, रचला किडनॅपचा बनाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - तेलंगणाच्या रंगा रेड्डी जिल्ह्यात एका नराधमाने स्वतःच्याच 15 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केली. मुलीचा मृतदेह सापड्ल्यानंतर पोलिसांनी बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी मुलगी किडनॅप झाल्याचा बनाव रचला होता, मात्र पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने गुन्हा कबूल केला.
पोलिस म्हणाले - नशेत केला बलात्कार
पोलिस आयुक्त एम. श्रीनिवास म्हणाले, आरोपी कमल नशेत असताना त्याने मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर समाजात बदनामी होईल या भीतीने त्याने मुलीची हत्या केली. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यासोबतच तिच्या डोक्यावर मार लागल्याच्या खूणा आहेत.
पोलिसांनी रविवारी या प्रकरणाचा खुलासा केला. शुक्रवारी सकाळी एका मुलीचा मृतदेह सापडला, त्यानंतर तिच्या वडिलांनी मुलगी किडनॅप झाल्याची तक्रार दाखल केली. त्यात म्हटले, की गुरुवारी रात्री आम्ही दोघे (मुलगी आणि तो) बाईकवर घरी जात असताना एका अज्ञात तरुणाने हल्ला केला आणि मुलीला अॅटो रिक्शातून पळवून नेले. दुसऱ्या दिवशी सकाळी घटनास्थळाहून काही अंतरावर मुलीचा मृतदेह सापडला.