आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मैत्रिणीच्या काकाने भेटायला बोलावले; फ्लॅटमध्ये कोंडून मित्रासह केले असे काही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भागलपूर (बिहार) - येथे एका तरुणीवर गँगरेपचे प्रकरण समोर आले आहे. पीडितेच्या रूम पार्टनरच्या काकाने तरुणीला दारू पाजली, मग आपल्या फ्लॅटवर नेऊन गँगरेप केला. सूत्रांनुसार, पीडितेची आरोपीशी ओळख होती. घटनेदरम्यान विरोध केल्याने मुलीला मारहाणही झाली.

 

हायस्कूल स्टुडंट आहे पीडिता

- ही घटना भागलपूरमधील माँ भगवती अपार्टमेंटमधीली आहे. येथे आरोपी मनीष राज फ्लॅट नं. 201 मध्ये राहतो. मनीषने 15 वर्षीय मुलीला रविवारी दारू पाजली. यानंतर तिला घेऊन फ्लॅटवर पोहोचला. येथे आरोपीचा चुलत भाऊ आधीपासूनच उपस्थित होता. दोघांनी मिळून मुलीवर गँगरेप केला. विरोध केल्यावर आरोपींनी मुलीच्या पार्टलाही जखमी केले. सध्या, मुलीची प्रकृती चिंताजनक झाल्याने पोलिसांनी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले आहे.

 

लॉजमध्ये राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती
- पीडितेची आई नर्स आहे. घटनेची माहिती मिळताच आरोपी मनीष राज आणि त्याचा चुलत भाऊ सन्नी यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. सूत्रांनुसार, पीडिता हायस्कूल स्टुडंट आहे आणि भागलपूरच्या एका लॉजमध्ये राहून ती स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. आरोपी मनीषची पुतणी आणि पीडिता दोघीही या लॉजमध्ये रूम पार्टनर आहेत.

 

खोलीत आढळल्या दारूच्या बाटल्या...
- सिटी डीएसपी शहरयार अख्तर व त्यांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून तपास केला. ज्या खोलीमध्ये मुलीवर गँगरेप झाला, त्याचीही पोलिसांनी झाडाझडती घेतली. तेथे दारूच्या बाटल्या, दोन रिकामे ग्लास आढळले. मनीषच्या फ्लॅटमध्ये खनन विभागाचे बनावट चालान आणि स्टॅम्पही आढळले, याचाही पोलिस तपास करत आहेत.

 

पीडितेने पोलिसांना दिला हा जबाब...
- मनीषशी माझी ओळख रूम पार्टनरमुळे झाली. त्याच्यासोबत मी अनेक वेळा परीक्षा द्यायला बाहेर गेले आहे. रविवारी संध्याकाळी 6 वाजता मनीषने मला त्याच्या फ्लॅटवर बोलावले. तेथे खोली बंद करून बळजबरी दारू पाजली. मनीषसोबत त्याचा चुलतभाऊ सन्नीही होता. नशेमध्ये दोघांनी माझ्यावर रेप केला. विरोध केल्यावर दोघांनी बेदम मारहाण केली. रात्री 9 वाजता मी मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात केली, तेव्हा सन्नी पळून गेला. यानंतर मी कशीबशी मनीषला खोलीत बंद करून बाहेर निघाले आणि आरडाओरड केली. मग सव्वा नऊ वाजता अपार्टमेंटमध्ये राहणारे इतर लोकही माझा आवाज ऐकून जमा झाले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. यादरम्यान तेथे जमलेल्या लोकांनी मनीषला खोलीतून बाहेर खाली आणले. सर्वांसमोर मनीष तेथून बाइकवरून पळून गेला. काही वेळाने पोलिस पोहोचले आणि मला हॉस्पिटलमध्ये नेले. (जसा पीडितेने पोलिसांना जबाब दिला...)

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज....

बातम्या आणखी आहेत...