आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Exclusive: UP मध्ये विजय साकारण्यासाठी शहांनी हेरले होते यांना, 3 वर्षांपासून तयारी करत होते हे स्ट्रॅटेजी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुनील बन्सल यांच्या नेतृत्त्वात सुमारे 10 प्रकारच्या मोहिमा राबवण्यात आल्या. त्यामुळे 5 कोटींहून अधिक लोकांना पक्षाशी जोडल्याचा दावा करण्यात आला. (फाइल) - Divya Marathi
सुनील बन्सल यांच्या नेतृत्त्वात सुमारे 10 प्रकारच्या मोहिमा राबवण्यात आल्या. त्यामुळे 5 कोटींहून अधिक लोकांना पक्षाशी जोडल्याचा दावा करण्यात आला. (फाइल)
लखनऊ - युपी विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या मोठ्या यशाच्या मागे अमित शहा यांच्या मायक्रो मॅनेजमेंटची महत्त्वाची भूमिका होती असे मानले जात आहे. पण आणखी एक अशी व्यक्ती आहे, ज्यांनी उत्तर प्रदेशात भाजपच्या विजयाची रणनिती आखली होती. घोषणांबरोबर सोशल मीडियावर पक्षाबरोबर लोकांना जोडण्याचे काम त्यांनी केले. ते आहेत युपीचे भाजपचे महामंत्री सुनील बन्सल। त्यांनी पडद्याच्या मागे राहत, अमित शहा आणि पार्टीसाठी रणनिती तयार केली. आता त्यांनी युपीचे अमित शहादेखिल म्हटले जात आहे. 

बन्सल यांनी युपीत आढळल्या 3 कमकुवत बाबी.. 
- पहिली, बन्सल 2014 मध्ये शहा यांच्या सांगण्यावरून युपीमध्ये आले होते. त्यानंतर 2015 च्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी अगदी तळापर्यंत जात काम केले. 
- यावेळी निवडणुकीत बूथ मॅनेजमेंटपासून वेगवेगळ्या कॅम्पेनच्या माध्यमातून 5 कोटींपेक्षा अधिक लोकांना जोडण्याची रणनिती तयार केली. 
- दूसरी, 2014 मध्ये युपीच्या इलेक्शन मॅनेजमेंटचा बेस समजल्या जाणाऱ्या 1.40 लाख पोलिंग बूथपैकी भाजप केवळ एक चतुर्थांश बूथपर्यंतच पोहोचले होते. पण 2016 च्या अखेरीपर्यंत मेंबरशिप कॅम्पेनच्या मदतीने भाजप पक्ष सुमारे 1.28 लाख बूथपर्यंत पोहोचला. बन्सल यांच्या मते प्रत्येक बूथवर सरासरी 10 कार्यकर्ते होते. 
- तीसरी, या सर्वामुळे भाजपला उच्चवर्णीयांचा पक्ष असल्याची प्रतिमा पुसण्यात यश आले. आता पक्षाने दावा केला आहे की, युपीमध्ये कनिषठ स्तरावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये सुमारे 40% ओबीसी आणि एसटी आहेत. बन्सल यांच्यामते आदी हा आकडा 10% होता. अखेरचा टप्पा  होता तो उमेदवारांची निवड करण्याचा. त्यासाठी भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. विशेषतः इतर पक्षांतून आलेल्या नेत्यांना तिकिट देण्यावरून. त्यांची संख्या जवळपास 80 होती. 

10 कॅम्पेनद्वारे 5 कोटींपेक्षा अधिक लोकांना जोडले 
- सुनील बन्सल यांच्या नेतृत्त्वात सुमारे 10 प्रकारचे कॅम्पेन चालवण्यात आले. त्याद्वाके 5 कोटींपेक्षा अधिक लोकांना जोडल्याचा दावा करण्यात आला. 
हे होते प्रमुख कॅम्पेन 
#5 नोव्हेंबरपासून सुरू केलेली परिवर्तन यात्रा युपीच्या चारही दिशांना सुरू करण्यात आली. त्याअंतर्गत राज्याच्या वेगवेगळ्या भागांत 213 सभा झाल्या. प्रत्येक सभेत 21 हजार तरुणांचा सहभाग असल्याचा दावा करण्यात आला. 
# त्याशिवाय 2 लाखांपेक्षा अधिक नुक्कड सभा (चौकाचौकात)  झाल्या. त्यात 12 लाख 85 हजारांपेक्षा अधिक लोक सहभागी झाले. 
#88 युवा संमेलनांद्वारे 4 लाख 65 हजार लोक जोडले गेले. राजकारणाद्वारे बदल कसा घडवून आणला जाऊ शकतो हे तरुणांना सांगण्यात आले. 
#77 महिला संमेलनांना उडाण नाव देण्यात आले. त्यात 2 लाख 60 हजार 600 महिलांना राजकीय दृष्ट्या जोडले गेले. 
#200 मागावर्गीयांची संमेलने घेण्यात आली. त्यात 8 लाख 39 हजार मागासवर्गीयांना पक्षाशी जोडण्याचे काम कऱण्यात आले. 

अमित शहांच्या सांगण्यावरून युपीत आले होते बन्सल 
- युपी निवडणुकीत भाजपला जिंकवण्यासाठी 1 लाखांपेक्षा जास्त WhatsApp ग्रुप्स चालवणे, सोशल मीडिया टीम मॅनेज करणे, सभांचे आयोजन अगदी स्टेज लावण्यापासून ते मंत्री नेत्यांच्या विमान प्रवासांपर्यंत आणि निवडणुकीतील घोषणांजी जबाबदारीही सुनील बन्सल यांच्याकडेच होती. 
- बन्सल यांना अमित शहांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान, अभाविपच्या सरचिटणीस पदावरून हटवत राज्याच्या संघटनेचे महामंत्री बनवले. 
- बन्सल बाहेरचे असल्याने पक्षात काहीसा अंतर्गत विरोधही झाला पण त्यांचे डाटा मॅनेजमेंट आणि जातीनिहाय आकडेवारीला मतांमध्ये रुपांतरीत करण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळेच 2014 मध्ये भाजपला पूर्ण बहुमत असलेले सरकार स्थापन करता आले. 
- त्यामुळे त्यांची पक्षातील उंची वाढली आणि यूपी विधानसभा निवडणुकीची जबाबदारी त्यांना देण्यात आली.
- सुनील बन्सल राजस्थानच्या जयपूरशी संबंधित होते. 

बन्सल यांच्याकडे झोपायलाही नव्हता वेळ 
- उत्तर प्रदेशातील भाजपचे प्रवक्ते राकेश त्रिपाठी यांनी सांगितले की, जेवढे कॅम्पेन आणि योजना युपी निवडणुकीसाठी राबवण्यात आले, त्या सर्वांवर बन्सल यांची बारीक नजर होती. 
- ते झोपत कधी असतील याचेही आम्हाला आश्चर्य वाटते. ते रात्री स्वतः 12-1 वाजता आम्हाला पोन करून मॉनिटरिंग आणि कामाबाबत चर्चा करायचे. त्यानंतर सकाळी 5 वाजता पुन्हा त्यांचे कॉल रॅलींशी संबंधित लोकांना जायचे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...