आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत समजून पेन्शन जारी, जवान 7 वर्षांनी परतला, गेली होती स्मृती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहरोड (अलवर)- कहाणी पूर्णपणे फिल्मी आहे, पण खरी आहे. सात वर्षांपूर्वी लष्कराची कार अपघातग्रस्त झाल्यानंतर अलवर जिल्ह्याच्या भिटेडा येथील निवासी हवालदार धर्मवीर यादव बेपत्ता झाले होते. त्यांची स्मृतीही गेली होती. त्यामुळे ते घरी परतले नाहीत तसेच लष्करातही ड्युटीवर गेले नाहीत. अनेक ठिकाणी भटकंती केली. लष्करानेही मृत मानून त्यांच्या पत्नीच्या नावे पेन्शन जारी केली. दरम्यान हरिद्वारमध्ये भटकत असलेल्या धर्मवीर यांना पाच दिवसांपूर्वी एका दुचाकीस्वाराने धडक दिली. मग पुन्हा डोक्याला लागून स्मृती परतली. उपचारानंतर भिटेडात सोमवारी रात्री एकच्या सुमारास घरी पोहोचले. दार ठोठावले आणि नातेवाइकांनी दार उघडताच सर्वच जण आश्चर्यचकित झाले. सर्वांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. वडील कैलाश आणि आई संतरादेवी यांनी गळाभेट घएतली. धर्मवीर ३९ वर्षांचे आहेत. त्यांना संगीता (१९ वर्षे) आणि पुष्पा (१७ वर्षे) या दोन मुली आहेत. वडिलांना पाहून दोघीही आश्चर्यचकित झाल्या. त्यांच्या डोळ्यांतही आनंदाश्रू होते. धर्मवीर परतल्याची माहिती लष्कराला देण्यात आली. धर्मवीर यांचे वडील सेवानवृत्त सुभेदार कैलाश यादव आणि आई संतरादेवी यांनी सांगितले की, मुलगा बेपत्ता असल्याचे मोठे दु:ख होते. डेहराडूनच्या आसपास, नातेवाईक, मित्रांकडे खूप शोधले, पण मुलाची माहिती मिळाली नाही. पण एक दिवस तो परत येईल, असा विश्वास होता.

धर्मवीर परतल्याची माहिती लष्कराला दिली आहे
धर्मवीर लष्करात असताना डेहराडूनच्या रस्ते अपघातानंतर सात वर्षांपूर्वी बेपत्ता झाला होता. सोमवारी रात्री तो घरी परतला. त्याच्या बटालियनला माहिती दिली आहे. धर्मवीरची मानसिक स्थिती कमजोर असल्याने तपासणी केली जात आहे.
- आर.पी. यादव, जिल्हासैनिक कल्याण अधिकारी, अलवर

धर्मवीर एप्रिल १९९४ मध्ये अहमदनगरला लष्करात ६६ आर्म्ड कोरमध्ये भरती झाला. त्यानंतर डेहराडूनच्या मिलिटरी स्कूलमध्ये स्पोर्टस कोच झाले. २७ नोव्हेंबर २००९ च्या रात्री अपघात झाला.

पुढील स्लाइडवर वाचा, भिकारी होऊन भटकत असल्याचेच आठवते : धर्मवीर
बातम्या आणखी आहेत...