कौशांबी - येथे एका व्यक्तीने आपल्या अवघ्या 7 महिन्यांच्या भाचीचा मृतदेह खांद्यावर घेऊन तब्बल 10 किमींचा सायकल प्रवास केला. सरकारी रुगणालयात भाचीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीने रुग्णाहिका मागितली. मात्र, रुगणालय प्रशासनाने त्यासाठी 800 रुपयांची मागणी केली. हे प्रकरण माध्यमांमध्ये पसरल्याचे पाहता आता स्थानिक प्रशासनाने न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत.
- हे प्रकरण उत्तर प्रदेशच्या कौशांबी जिल्ह्यातील आहे. येथील एका गावात राहणाऱ्या अनंत कुमार याची 7 महिन्यांची मुलगी पूनम हिला सोमवारी सकाळी अचानक उलट्या सुरू झाल्या. तिला तातडीने जिल्हा रुगणालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.
- कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, "आम्ही रुगणलयापर्यंत जाण्यासाठी रुग्णवाहिका केली होती. परत येण्यासाठी आमच्याकडे कोणतेही साधन उपलब्ध नव्हते. मुलीचा मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी आम्ही रुगणालय प्रशासनाकडे रुग्णवाहिकेची मागणी केली. मात्र, त्यासाठी प्रशासनाने आम्हाला 800 रुपयांची मागणी केली."
- त्यामुळे, मुलीच्या मामाला आपण रुगणालयात आणलेली सायकल घेऊन भाचीचा मृतदेह खांद्यावर घरी घेऊन जावा लागला. अगदी 10 किमी पर्यंतचा प्रवास त्यांनी असाच केला.