आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या पतीला सोडून दीरासोबत पळाली, लग्नानंतर आणखी एका बॉयफ्रेंडसोबत संबंध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फरिदाबाद (हरियाणा) - पोलिस आयुक्त कार्यालयाच्या गेटसमोर विषारी गोळ्या खाऊन आत्महत्या करणाऱ्या भूपेशच्या बॅगमध्ये एक सुसाइड नोट सापडली आहे. त्याआधारावर सुरजकुंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सल्फास गोळ्या घेण्यापूर्वी भूपेशने सुसाइड नोट लिहिली होती, त्यात त्याने पत्नी सत्या उर्फ मिथलेशचे शेजारच्या गावातील जीतू ठाकुरसोबत लव्ह अफेअर असल्याचे म्हटले आहे.
भूपेशवर का आली आत्महत्येची वेळ...
- सुसाइड नोटमध्ये भूपेशने लिहिले, की सत्या आणि जीतू त्याला रोज अपमानित करीत होते. त्यामुळे आत्महत्या करीत आहे.
- सुसाइड नोट समोर आल्यानंतर पोलिसांनी सत्या आणि तिचा प्रियकर जीतूविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
- 35 वर्षांचा भूपेश गौंछी गावचा रहिवासी होता. त्याला 15 आणि 8 वर्षांच्या दोन मुली आणि 11 वर्षांचा मुलगा आहे.
- भूपेश आणि सत्या यांच्यात पाच-सहा महिन्यांपासून भांडण सुरु होते.
बॅग तपासल्यानंतर सापडली सुसाइड नोट
- ठाणे अंमलदार दर्पण कुमार यांनी सांगितले, की भूपेशजवळ जे सामान आणि बॅग होती, ती त्याचा भाऊ हरीश जवळ देण्यात आली. अंत्यसंस्कारानंतर हरीशने त्याची बॅग तपासली तर त्यात सुसाइड नोट सापडली.
- ते म्हणाले, सुसाइड नोटच्या आधारे पोलिसांनी सत्या आणि जीतूविरोधात आयपीसीच्या कलम 306, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
वहिणीला पळवून केले होते लग्न
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्या उर्फ मिथलेशचे पहिले लग्न भूपेशच्या मोठ्या भावासोबत झाले होते.
- लग्नानंतर वहिणी सत्या आणि दीर भूपेश यांचे प्रेमसंबंध जुळले आणि भूपेशने वहिणीला घरातून पळवून नेले होते.
- दोघे घरी परतले तर कुटुंबाच्या संमतीने भूपेश आणि सत्याचे लग्न लावून देण्यात आले होते.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, भूपेश-सत्या आणि जीतू ठाकुर यांचे लव्ह ट्रॅंगल...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...