आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या 3 महिन्यांनीच पत्नीचा मर्डर, 2 तासांनी पतीने उचलले हे पाऊल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंकित आणि निधीचे 3 महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. - Divya Marathi
अंकित आणि निधीचे 3 महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते.
बिजनौर - यूपीच्या बिजनौरमध्ये एका व्यक्तीने अगोदर आपल्या पत्नीचा गळा चिरून खून केला, त्यानंतर स्वत: ट्रेनखाली कटून जीव दिला. 3 महिन्यांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. तरुण पती-पत्नीच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश केला. पोलिसांनी मृतदेहांना पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहे.
 
अनेक दिवसांपासून होता पती-पत्नीत तणाव
- हे प्रकरण बिजनौरच्या मंडावर परिसरातील आहे. येथे राहणाऱ्या अंकितचे लग्न 27 जून 2017 रोजी बिजनौरच्या निधीशी झाले होते.
- सूत्रांनुसार, लग्नानंतर सर्व सुरळीत होते, परंतु अचानक अंकित मानसिकदृष्ट्या त्रस्त दिसू लागला. पती-पत्नीत रोज भांडणे होऊ लागली. रविवारी कुटुंबातील सर्व एका कार्यक्रमासाठी गेले होते. घरी निधी, आजी आणि काका होते.
- दुपारी एक वाजता जेवणे केल्यावर काका आपल्या खोलीत बसून टीव्ही पाहत होते. तर निधी तिच्या खोलीत होती. यादरम्यान अंकित काकाच्या खोलीत गेला आणि त्याने त्यांच्या टीव्हीचा आवाज वाढवून माघारी फिरला.
- काही वेळाने आजीने निधीच्या खोलीत डोकावून पाहिले, तर तिथे निधी रक्ताने माखलेली फरशीवर पडून होती. तिच्या चारही बाजूंनी रक्त साकळले होते. आजीने आरडाओरड सुरू केली. त्यांचा आवाज ऐकून शेजारपाजारचे लोक धावत आले आणि त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.
- घटनेची माहिती मिळताच मंडावर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले.
 
पत्नीच्या मृत्यूनंतर 2 तासांनी रेल्वे ट्रॅकवर आढळला पतीचा मृतदेह
- निधीचा खून झाल्यावर तिच्या माहेरच्यांनी अंकितच्या अटकेची मागणी केली. दुपारी 3 वाजता माहिती मिळाली की, एका अज्ञात तरुणाचा मृतदेह नाईवाला गावाजवळच्या रेल्वे पटरीवर आहे. घटनास्थळी पोहाचलेल्या पोलिसांना तो अंकित असल्याचे समजले.
- एसपी अतुल शर्मा म्हणाले की, नातेवाइकांनी तक्रार दिल्यास त्या आधारे गुन्हा दाखल केला जाईल. पोलिस याप्रकरणी आपल्या स्तरावर तपास करत आहेत.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...