आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच मुलीवर 2 भाऊ झाले फिदा, एकतर्फी प्रेमाचा असा झाला THE END

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकाच मुलीवर प्रेम असल्याने दोन भावांत भांडणे व्हायची. - Divya Marathi
एकाच मुलीवर प्रेम असल्याने दोन भावांत भांडणे व्हायची.
कानपूर - यूपीच्या कानपूरमध्ये रविवारी एका व्यक्तीने रेल्वे ट्रॅकवर ट्रेनखाली कटून आत्महत्या केली. सूत्रांनुसार, 2 भाऊ एकाच मुलीवर प्रेम करत होते. यावरून दोघांमध्ये भांडणे सुरू होती. यामुळेच एका भावाने हे पाऊल उचलले. रेल्वे ट्रॅकवर पडलेल्या मृतदेहाला दुसऱ्या भावाने स्वत: उचलले.
 
मित्रासारखे राहायचे भाऊ...
- गोविंदनगर परिसरातील गुजैनी आय ब्लॉकमध्ये प्रभा शर्मांचे कुटुंब राहते. प्रभा यांचे पती श्यामसुंदर यांचे 4 वर्षांपूर्वी निधन झालेले आहे.
- त्यांना 4 मुले नीतू (29), मनू (25), अनुप (20), मयंक (18) आणि दोन मुली लाली आणि ममता आहेत. चारही मुले खासगी नोकरी करतात, तर दोन बहिणींचे शिक्षण सुरू आहे.
- अनुप आणि मयंक दोघे जीवाभावाचे सोबती होते. नेहमी सोबत राहायचे. सोबतच नोकरीही करायचे.
 
एकतर्फी प्रेमात गेला जीव
- सूत्रांनुसार, अनुप आणि मयंक एकाच मुलीला पसंत करायचे. अनुपचे नेहमी त्या मुलीशी फोनवर बोलणे व्हायचे. हे कळल्यावर मयंकही मयंकही त्या मुलीवर प्रेम करायला लागला.
- यावरून दोघांत भांडणे व्हायला लागली. मोठा भाऊ नीतू म्हणाला, रविवारी आम्हाला सुट्टी होती आणि मी घरीच होतो. संध्याकाठी साडे 5 वाजता एका मुलाने सांगितले की झांशी रेल्वे लाइनवर अनुपने सुसाइड केले आहे.
- मी लगेच तिथे जाऊन पाहिले तर माझ्या भावाच्या शरीराचे दोन तुकडे झालेले होते. काही वेळाने पोलिसही आले.
- एक ट्रेन माझ्या भावाच्या शरीरावरून गेली. हे मला पाहावले नाही. पुन्हा दुसरी ट्रेन येत होती, मी लगेच त्याचा देह रेल्वे ट्रॅकवरून हटवला.
 
पोलिस काय म्हणतात?
- गोविंदनगरचे पोलिस निरीक्षक रणवीर सिंह म्हणाले, एका तरुणाने झांशी रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या केली आहे. त्याचे शरीर पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आले आहे. यामागचे कारण अजून उघड झालेले नाही. प्रकरणाचा तपास सुरू आहे. नातेवाइकांनी अद्याप तक्रार दिलेली नाही.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, घटनेचे आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...