आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 भाऊ करू लागले एकाच तरुणीवर प्रेम, ढसाढसा रडत मोठा म्हणाला- दोघे बोलले असते तर...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेल्वे येत असल्याचे पाहून भावानेच भावाचा मृतदेह असा पटरीवरून उचलून बाजूला केला. - Divya Marathi
रेल्वे येत असल्याचे पाहून भावानेच भावाचा मृतदेह असा पटरीवरून उचलून बाजूला केला.
कानपूर - ही घटना 13 ऑगस्ट 2017ची आहे. रेल्वे ट्रॅकवर एका तरुणाचा मृतदेह पडलेला होता. त्याचा भाऊ आक्रोश करत होता. समोरून रेल्वे येताना पाहून भावाच्या तुकडे-तुकडे झालेल्या मृतदेहाला त्याने स्वत:च्या हाताने बाजूला सारले. हृदय भरून येणारे हे दृश्य पाहिल्याने तेथे उपस्थित लोकांच्या डोळ्यात आपसूक पाणी आले. मृत्यूचे कारण एक तरुणी निघाली. भाऊ म्हणाला- एकाच तरुणीवर आम्ही दोघेही भाऊ प्रेम करू लागलो होतो. 
- यंदा घरोघरी दिवाळी साजरी केली जातेय, पण आज आमचा भाऊ आमच्यात नाही. ती घटना आठवून आजही मी स्वत:ला दोष देतो असे मृताचा भाऊ म्हणाला.  पूर्ण कुटुंब दु:खात बुडाले आहे.
 
मित्रांसारखे नेहमी सोबत राहायचे दोन्ही भाऊ...
- गोविंदनगर परिसरातील गुजैनी आय ब्लॉकमध्ये प्रभा शर्मांचे कुटुंब राहते. प्रभा यांचे पती श्यामसुंदर यांचे 4 वर्षांपूर्वी निधन झालेले आहे.
- त्यांना 4 मुले नीतू (29), मनू (25), अनुप (20), मयंक (18) आणि दोन मुली लाली आणि ममता आहेत. चारही मुले खासगी नोकरी करतात, तर दोन बहिणींचे शिक्षण सुरू आहे.
- अनुप आणि मयंक दोघे जीवाभावाचे सोबती होते. नेहमी सोबत राहायचे. सोबतच नोकरीही करायचे.
 
एकतर्फी प्रेमात गेला होता जीव
- सूत्रांनुसार, अनुप आणि मयंक एकाच मुलीला पसंत करायचे. अनुपचे नेहमी त्या मुलीशी फोनवर बोलणे व्हायचे. हे कळल्यावर मयंकही मयंकही त्या मुलीवर प्रेम करायला लागला.
- यावरून दोघांत भांडणे व्हायला लागली. मोठा भाऊ नीतू म्हणाला, रविवारी आम्हाला सुट्टी होती आणि मी घरीच होतो. संध्याकाठी साडे 5 वाजता एका मुलाने सांगितले की झांशी रेल्वे लाइनवर अनुपने सुसाइड केले आहे.
- मी लगेच तिथे जाऊन पाहिले तर माझ्या भावाच्या शरीराचे दोन तुकडे झालेले होते. काही वेळाने पोलिसही आले.
- एक ट्रेन माझ्या भावाच्या शरीरावरून गेली. हे मला पाहावले नाही. पुन्हा दुसरी ट्रेन येत होती, मी लगेच त्याचा देह रेल्वे ट्रॅकवरून हटवला.
- सर्वात मोठा भाऊ म्हणाला, फक्त एकमेकांशी स्पष्ट न बोलल्याने एका भावाने जीव दिला. या दोघांनी एकमेकांशी संवाद साधला असता तर आज तो जिवंत असता. एका अंतरामुळे हे दोघे दूर झालो होतो. मयंक आता आमच्यात राहत नाही. तो दिल्लीत खासगी नोकरी करतोय. आम्हाला त्या तरुणीबाबतही माहिती नाही, जिच्यामुळे एवढी मोठी दुर्घटना झाली.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, घटनेचे आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...