(फोटो- ढिगाऱ्याखालून 72 तासांनी बाहेर आलेला तरुण.)
चेन्नई- पोरुर परिसरात कोसळलेल्या 12 मजली इमारतीच्या ढिगाऱ्याखालून तब्बल 72 तासांनी एका तरुणाला वाचविण्यात बचाव दलाला यश मिळाले. परंतु, ढिगाऱ्याखालून काढल्यानंतर त्याने विचारलेल्या प्रश्नाने सर्वांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली. तो तरुण म्हणाला, की माझ्या स्लिपर्स कुठे आहेत.
बचाव दलाचे जवान इमारतीचा ढिगारा काढण्याचे काम करत आहेत. या दलाचा श्वान रुस्तम याने एका खोल छिद्राच्या दिशेने भुंकण्यास सुरवात केली. त्यानंतर त्याने त्यावर ठिय्याच दिला. यामुळे याखाली एखादी व्यक्ती असावी, असा अंदाज बचाव दलाने बांधला. त्यानंतर लाईफ डिटेक्टर्स, कटर्स, कॅमेरा आदी अत्याधुनिक साधनांच्या मदतीने ढिगाऱ्याखालील व्यक्तीला बाहेर काढण्यात आले. सुमारे आठ तासांच्या प्रयत्नानंतर पिवळे टिशर्ट घातलेला हा तरुण बाहेर आला. त्यानंतर त्याने बचाव दलाच्या कर्मचाऱ्यांना विचारलेल्या भलत्याच प्रश्नाने सर्वत्र हास्य फुलले. तो म्हणाला, की माझ्या स्लिपर्स कुठे आहेत.
त्यावर शांतपणे उत्तर देताना बचाव दलाचे कमांडर एम. के. वर्मा म्हणाले, की मी तुला नवीन स्लिपर्स घेऊन देईन.
या तरुणाचे नाव विकासकुमार असून तो मुळचा ओरिसाचा आहे. ढिगाऱ्याखालून बाहेर आल्यावर एका व्यक्तिने दिलेले बॉटलभर पाणी त्याने घडाघाडा प्राशन केले. काही चेहऱ्यावर मारले. आकाशाकडे बघत देवाचे आभार मानले. त्याच्या टीशर्टवर 'Let your heart make your choice. BE INSANE.' असे इंग्रजीत लिहिले होते. परंतु, त्याने विचारलेला प्रश्न सर्वांना हसवून गेला.
पुढील स्लाईडवर बघा, घटनास्थळाची छायाचित्रे....