आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाहरगड किल्ल्यावर मृत्यूआधी चेतनने काढल्या 5 सेल्फी, 10 लाखांचे कर्जही होते डोक्यावर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - नाहरगड किल्ल्याच्या बुरुजावर शुक्रवारी सकाळी 40 वर्षीय चेतन सैनीचा मृतदेह दोरीने लटकलेला आढळला. जवळच्याच दगडांवर लिहिलेले होते की, पद्मावतीचा विरोध करणाऱ्यांनो  आम्ही फक्त पुतळे जाळत नाहीत. आता या केसमध्ये नवनवे खुलासे होत आहेत. त्याच्या मोबाइलवरून कळतेय की, फाशी घेण्याआधी चेतनने किल्ल्यावर 5 सेल्फी घेतल्या होत्या. याशिवाय 8 ते 10 लाख रुपये कर्जाचीही बाब समोर आली आहे. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, दगडांवर लिहिलेले हस्ताक्षर त्याचे नाही.


काय आहे प्रकरण?
चेतनचा मृतदेह शुक्रवारी नाहरगड किल्ल्यावर लटकलेला आढळला होता. घटनास्थळी तब्बल 20 ते 22 दगडांवर कोळशाने पद्मावती चित्रपटाशी निगडित वादग्रस्त विधाने लिहिलेली होती.

 

काय लिहिले होते दगडांवर...

> घटनास्थळाच्या आसपास दगडांवर वादग्रस्त 5 वाक्ये लिहिलेली होती..
1. पद्मावती का विरोध करने वालों हम सिर्फ पुतले नहीं जलाते हैं। 
2. हम किले पर सिर्फ पुतले नहीं टांगते। 
3. लुटेरे नहीं अल्लाह के बंदे हैं, एक-एक दस पर भारी है। 
4. चेतन तांत्रिक मारा गया। 
5. ये तो सिर्फ एक झांकी है, शुरुआत अभी बाकी है।

 

> असे मानले जात आहे की, आरोपींनी पद्मावतीचा मुद्दा बनवून पोलिसांना भरकटवण्याचा तसेच प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला आहे.

 

कोण होता चेतन?
- चेतन जयपूरच्या नाहरी नाका परिसरात पंचमुखी कॉलनीत राहत होता. तो आर्टिफिशयल ज्वेलरीचे काम करायचा.
- चेतनच्या कुटुंबात पत्नी, एक मुलगा (9) आणि मुलगी (13) आहे.

 

या प्रकरणी 5 मुद्दे समोर आले आहेत...

1. चेतनने नाहरगड किल्ल्यावर एकूण 5 सेल्फी काढल्या होत्या. मोबाइलचे लोकेशन ट्रेस केल्यावर पोलिसांना कळले की संध्याकाळी 5 वाजेपासून चेतन नाहरगड किल्ल्यावरच होता.
2. दुसरीकडे, त्याच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, दगडांवरील हस्ताक्षर चेतनचे नाही. हे चेतनने लिहिलेले नाही.
3. त्याची पत्नी नीतूने गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत 56 वेळा फोन केले. त्याच्या फोनवरूनच हे कळले.
4. त्याच्यावर 10 लाख रुपयांचे कर्ज होते. घटनेच्या दिवशी त्याच्या पत्नीला एका कर्जदाराचा फोनही आला होता.
5. चेतन गुरुवारी 3.30 वाजता मुलांना शाळेतून घरी आणून सोडून बाजारात गेला होता. यानंतर त्याने पत्नीला संध्याकाळी 5 वाजता फोन करून म्हटले की, तो रात्री 9 पर्यंत घरी येईल. जेवण तयार ठेव. तो घरी आला नाही म्हणून नीतूने अनेक वेळा फोन केले, परंतु कोणताही रिस्पॉन्स मिळाला नाही. 

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...