आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS: निवडणूक हारले तरीही ग्रामस्थांनी दिले 11,11,111 रु. चे बक्षीस, केला हार घालून सत्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर- भावी गावातील लोकांनी ग्रामपंचायत निवडमूकांमध्ये शंकरलाल ढाका यांना सरपंच पदाचा उमेदवार बनवले. मात्र निकाल हातात आला तेव्हा ढाका यांचा 1142 मतांनी पराजय झाला. गावकर्‍यांना या निकालाने दुःख तर झाले, मात्र त्यांनी ढाका यांचे मनोबल वाढवण्यासाठी एक वेगळीच शक्कल लढवली. बुधवारी गावकर्‍यांनी ढाका यांच्या घरी एक सभा ठेवली. येथे सर्वच स्तरातील लोकांनी एकत्र येऊन पैसे जमा करण्यास सुरुवात केली.
पाहाता पाहाता ही रक्कम 11 लाख 11 हजार 111 रुपयांपर्यंत पोहोचली. गावकर्‍यांनी ढाका यांना हार नारळ देत ही रक्कम देऊ केली. अशाच प्रकारे सांगरियामध्ये ग्रामपंचायतीची निवडणूक हारणारी महिला उमेदवार धीरज कंवर यांनासुध्दा गावकर्‍यांनी 5 लाख 62 हजार रुपये भेट दिली होती. यामध्ये मुस्लीम समाजाकडून 51 हजार आणि 36 समुदायातील लोकांनी 2 लाख रुपये देऊन सहकार्य केले.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, ढाका यांना 11,11,111 रुपये देतानाचे इतर फोटो...