आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केरळ : लुंगी घालून विधानसभा पाहायला केला मज्जाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिरुवनंतपुरम - लुंगी घालून केरळ विधानसभेचे कामकाज पाहण्यास आलेल्या एका व्यक्तीस व्हिजिटर गॅलरीत प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. अनौपचारिक पोशाखात आल्याचे त्यासाठी कारण देण्यात आले. घटनेनंतर राज्य मानवी हक्क आयोगाने अधिकाऱ्यांकडे उत्तर मागितले . तिथे येण्यासाठी कोणता विशेष ड्रेस कोड आहे काय? अशी विचारणा विधानसभा सचिवांना करण्यात आली. यावर विधानसभाध्यक्षांच्या कार्यालयाने म्हटले की, सभागृह किंवा गॅलरीत अनौपचारिक पोशाखाला मान्यता नाही. हा एक शिष्टाचार असून त्याचे पालन सर्वांनीच करायचे आहे.

मलाप्पुरमची कुंजीमोयिन नावाची व्यक्ती गेल्या ८ नोव्हेंबर रोजी ३८ जणांसोबत विधानसभेचे कामकाज पाहण्यासाठी गेली होती. मात्र, प्रवेश नाकारल्यानंतर त्याने मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली. विधानसभेचे मेन गेट किंवा प्रवेशद्वारावर रोखण्यात आले नाही. मात्र व्हिजिटर गॅलरीत जाण्यास मज्जाव करण्यात आल्याचे त्याचे म्हणणे होते.
बातम्या आणखी आहेत...