आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Man Killed Wife Seeing Her Giving Flying Kiss To Another Guy

प्रियकराला फ्लाइंग किस दिल्याने संतापला पुजारी, कात्रीने भोसकून केला पत्नीचा खून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपूर- उत्तर प्रदेशात एका पुजारीने त्याच्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शेजारी राहाणार्‍या एका युवकासोबत पुजार्‍याच्या पत्नीचे अफेयर सुरु होते. विशेष म्हणजे प्रियकराला फ्लाइंग किस देताना पुजारीने पत्नीला रंगेहात पकडले होते. यावरून संतापलेल्या पुजारीने पत्नीची कात्रीने भोसकून हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
असे आहे प्रकरण...
कानपूरमधील गोविंद नगरात 25 जूनला ही हत्याकांड घडले. पुजारी शिव प्रकाशची पत्नी संध्या हीचा मृतदेह घरात सापडला होता. तीक्ष शस्त्राने तिच्यावर वार करण्‍यात आले होते. 'घरात काही चोरटे शिरले होते. संध्याने त्यांना विरोध केला आणि त्यांनी तिची हत्या केली, असा खोटा जवाब पुजारी शिव प्रकाश यांनी पोलिसांत नोंदवला होता. परंतु, पोलिस चौकशीत पुजारीचे पितळ उघडे पडले. पत्नी संध्याची त्यानेच हत्या केल्याचे स्पष्ट झाले. संध्या आणि शेजारी राहाणार्‍या एका युवकाचे अफेयर सुरु होते. प्रियकराला फ्लाइंग किस देताना संध्याला खुद्द शिव प्रकाशने रंगेहात पकडले होते. त्यामुळे प्रचंड संतापलेल्या शिव प्रकाशने कात्रीने भोसकून संध्याची हत्या केली. आरोपी शिव प्रकाश याने गुन्हा कबूल केला आहे.