आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिमाचल: पशू तस्करीच्या संशयावरुन UP च्या व्यक्तीची हत्या, बजरंग दलावर आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिमला - दादरी प्रकरणावरुन उठलेले वादळ अजून शमलेले नसताना हिमाचल प्रदेशच्या राजधानी जवळ उत्तर प्रदेशच्या एक व्यक्तीची कत्तलीसाठी जनावरे नेत असल्याच्या संशयावरुन हत्या करण्यात आली आहे. मृत व्यक्तीच्या कुटुंबियांचा आरोप आहे, की बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पशू तस्कर असल्याच्या संशयावरुन त्याला मारहाण केली. देशात सध्या दादरी प्रकरण गाजत असताना झालेली ही हत्या केंद्र सरकारसाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण
नाहन जवळील सरहन गावात बुधवारी एका ट्रकमध्ये नोमान नावाची व्यक्ती अतिशय गंभीर अवस्थेत आढळली. पोलिसांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले, तिथे त्याचा मृत्यू झाला. त्याचे नातेवाईक इम्रान असगर म्हणाले, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी नोमानचा ट्रक अडवला. ट्रकमध्ये जनावरे होती. त्यांनी नोमानला बेदम मारझोड केली आणि त्याला जखमी अवस्थेत सोडून त्यांनी पळ काढला.

पोलिस काय करत आहे ?
ट्रकमधील इतर चार जणांवर पोलिसांनी हिमाचल प्रदेश काऊ स्लॉटर अॅक्ट आणि प्रिव्हेंशन ऑफ क्रुएलिटी टू अॅनिमल्स अॅक्ट अंतर्गत कारवाई केली आहे. नोमानच्या मारेकऱ्यांविरोधात कलम 302 नूसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत बजरंग दलाचा हात आहे का, याचा पोलिस शोध घेत आहे.
काय घडले होते दादरीमध्ये...
गेल्या 28 सप्टेंबरला युपीच्या दादरीमध्ये बीफ खाल्ल्याच्या अफवेनंतर 52 वर्षांचे मोहम्मद अखलाक यांची मारून मारून हत्या केली होती. तसेच त्याच्या 22 वर्षांच्या दानीश नावाच्या मुलालाही मारून अर्धमेला केले होते. गावाच्या मंदिरातून अखलाक घरी बीफ साठवून ठेवत असल्याचे जाहीर करण्यात आले होते, असा आरोप करण्यात आला आहे.

पुढील स्लाइडमध्ये,

हरियाणाचे CM म्हणाले, मुस्लीम देशात राहू शकतात, पण बीफ सोडावे लागेल