आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

35 वर्षीय व्यक्तिने सहा वर्षीय मुलीसोबत केला विवाह, PHOTO झाले व्हायरल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी रतनलाल जाट गंगरार ग्रामपंचायतचा सदस्य आहे - Divya Marathi
आरोपी रतनलाल जाट गंगरार ग्रामपंचायतचा सदस्य आहे
गंगरार/चित्तोडगड- राजस्थानातील गंगरारमध्ये 35 वर्षीय व्यक्तिने सहा वर्षीय मुलीसोबत गुपचूप विवाह केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर या विवाहाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अारोपी रतनलाल जाट फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झाले फोटो
26 जूनला या विवाहाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्‍यात आली. काही तासांतच फोटो अक्षरक्ष: व्हायरल झाले. जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून कारवाईचे आदेश दिले आहेत.

गंगरारचे एसडीएम ज्ञानमल खटीक यांनी सांगितले की, जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार समिती स्थापन करून लवकरच चौकशी करण्यात येणार आहे. चौकशी अहवालात आरोपी दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. रतनलाल जाटचा विवाह लावून देणारा पुरोहित सोनियाना हे ग्रामपंचायतचे उपसरपंच पती आहेत.

मिळालेली माहिती अशी की, गंगरार येथील रहिवासी आणि ग्रामपंचायत सदस्य रतनलाल जाट याचा विवाह होत नव्हता. काही दिवसांपूर्वी त्याला विवाहाचा प्रस्ताव आला होता. परंतु त्याआधी त्याला 'नाता विवाह' (बालविवाहाची एक परंपरा) करणे आवश्यक होते. त्यामुळे रतनलाल जाट याने 22 जूनला गावातील एका सहा वर्षीय मुलीसोबत गुपचुप विवाह केला.
मुलीच्या आई-वडिलांना रुपयेही दिले....
रतनलाल जाट याने मुलीच्या आई-वडीलींना रुपयांचे अमिष दाखवून गुपचूप 'नाता विवाह' उरकवून घेतला. मात्र, या प्रकरणाचा भांडाफोड झाल्यानंतर आरोपी आपल्या कुटुंबियांसोबत फरार झाला आहे.
राजस्थानात 'नाता विवाह'ची परंपरा...
राजस्थानातील काही भागात 'नाता विवाह'ची एक परंपरा आहे. बालवयातच मुला-मुलींचा विवाह लावण्यात येतो. परंतु, मुले-मुली मोठे झाल्यानंतर हा विवाह तोडण्यात येतो. नाता विवाह तोडल्यानंतर विवाहच्छूक तरुण दुसरा विवाह करण्‍यास स्वतंत्र असतो. मात्र, दुसरा विवाह करण्यापूर्वी पहिल्या पत्नीला 50 हजार ते 1.5 लाख रुपये द्यावे लागतात.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, 35 वर्षीय व्यक्ति आणि सहा वर्षीय मुलीच्या विवाहाचे व्हायरल झालेले फोटो...