आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेमध्ये छेडछाडीनंतर तरुणीचे फाडले कपडे, विरोधानंतर फेकण्याचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोबाइलमध्ये फोटो काढण्यास तरुणीने विरोध केला. - Divya Marathi
मोबाइलमध्ये फोटो काढण्यास तरुणीने विरोध केला.
महासमुंद (छत्तीसगड) - ओडिशा ते रायपूर पुशपुल पॅसेंजर ट्रेनमध्ये सोमवारी सकाळी दोन टवाळखोरांनी युवतीची छेड काढली, कपडे फाडण्याचा प्रयत्न केला. युवतीने त्यांना विरोध केला तर तिला चालत्या ट्रेनमधून फेकून देण्याचाही प्रयत्न झाला. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बोगीत जवळपास दीडतास दोन युवकांची टवाळखोरी सुरु होती. याच दरम्यान अज्ञात प्रवाशाने रेल्वे हेल्पलाइन 1091 वर कॉल केला. टीटीईची टीम तत्काळ बोगीत दाखल झाली आणि त्यांनी टवाळखोरांच्या तावडीतून युवतीची सुटका केली. मात्र दोन्ही युवक पळून जाण्यात यशस्वी झाले आणि दुसऱ्या बोगीत दडून बसले. महासमुंद रेल्वे स्थानकावर जीआरपी आणि आरपीएफच्या पथकाने रेल्वेला वेढा टाकून एकाला ताब्यात घेतले.
आरोपी परमानंदच्या साथीदाराचा शोध सुरु आहे. सोमवारी उशिरा रात्री परमानंदवर गुन्हा दाखल करुन त्याला तुरुंगात टाकण्यात आले. रेल्वे हेल्पलाइनच्या मदतीने टवाळखोरांना अटक करण्यात आल्याची ही येथील पहिलीच घटना आहे. आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की ट्रेनमध्ये जीआरपी आणि त्यांचे पथक होते, मात्र ते दुसऱ्याच बोगीत आरोपींचा शोध घेत असल्यामुळे एक आरोपी निसटला.

हेल्पलाइनची घ्यावी मदत
चालत्या रेल्वेत युवतीची छेडछाड सुरु असताना प्रवाशांनी उघड विरोध दर्शवला नाही आणि टवाळखोरांना पिटाळून लावले नसले तरी एका प्रवाशाने सतर्कता दाखवत रेल्वे हेल्पलाइन 1091 वर कॉल करुन घटनेची माहिती दिली. त्यानंतर टीटीई आणि रेल्वे पोलिसांचे पथक बोगीत दाखल झाले.
अशी घटना घडली तर काय करावे ?
138 - हा युनिक हेल्पलाइन क्रमांक आहे. देशातून कोठूनही या क्रमांकावर तक्रार नोंदवता येते. हा रिअल टाइम हेल्पलाइन क्रमांक आहे.
100 - हा स्थानिक पोलिस कंट्रोल रुमचा क्रमांक आहे. या क्रमांकावर रेल्वे प्रवाशी देखील तक्रार नोंदवू शकतात.
182 - हा सुरक्षा हेल्पलाइन क्रमांक आहे. प्रवासा दरम्यान केवळ महिलाच नाही तर इतरही प्रवाशी या क्रमांकावर तक्रार करु शकतात.
9717630982 - या क्रमांकावर एसएमएस करुन तक्रार नोंदवता येते. तक्रारीनंतर ऑन लाइन ट्रॅकिंग देखील शक्य आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, तरुणीच्या छेडछाडीचा घटनाक्रम रेखाचित्रांतून
बातम्या आणखी आहेत...