आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अविवाहित जेठाने भावजयीसोबत ठेवले अवैध संबंध, पळवून नेवून केले मित्रांच्या हवाली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिसांनी काही तासांतच पाच आरोपींना जेरबंद केले. त्यात दोन महिला आहेत. इन्सेट मृत पिंकी. - Divya Marathi
पोलिसांनी काही तासांतच पाच आरोपींना जेरबंद केले. त्यात दोन महिला आहेत. इन्सेट मृत पिंकी.
पाली / उदयपूर - राजस्थानच्या साकदडा गावातून 9 महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या विवाहितेचा मृतदेह तिच्या दोन मुलांसह 7 महिन्यांपासून जमीनीत गाडलेल्या अवस्थेत गुरुवारी सापडला. उदयपूरमध्ये सुरु असलेल्या 'ऑपरेशन स्माइल' अंतर्गत बेपत्ता मुलांची शोध मोहिम सुरु होती, त्यात पोलिसांना एका मुलाचा शोध घेताना या निर्घून खूनाचा उलगडा झाला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत काही तासांत पाच आरोपींना अटक केली आहे.

पोलिस तपासात उघड झाले अनेक रहस्य
एखाद्या चित्रपटाच्या कथानकाप्रमाणे या निर्घूण खूनाचा घटनाक्रम आहे. आरोपी फुलपुरी गोस्वामी मृत पिंकीचा जेठ आहे. फुलपुरी अविवाहीत होता, त्याने लहान भावाची पत्नी पिंकीसोबत अवैध संबंध ठेवून तिला तिच्या तीन वर्षांच्या मुलासह जून 2014 मध्ये जोधपूरला पळवून नेले. तिथे त्याने तिला त्याच्या दोन मित्रांना - मंगलराम पटेल आणि ओमप्रकाश देवासी यांच्या हवाली केले. या तिघांनी मिळून पिंकीवर जबरदस्ती केली. तिच्यासोबत दुष्कर्म करत राहिले. त्यातच तिने आणखी एका मुलाला जन्म दिला.

पिंकी फुलपुरी आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या दुष्कर्माचा भांडाफोड करण्याची धमकी देत होती, त्यामुळे त्यांनी तिला संपवले. या निर्घूण हत्याकांडात त्यांनी त्यांच्या बायकांनाही - रतनपुरी आणि विद्यादेवी यांनाही सहभागी करुन घेतले होते.

हे पाच जण 15 जून 2015 रोजी खूप दारू प्याले आमि त्यांनी पिंकीसह तिचा तीन वर्षांचा मुलगा दुर्गेश आणि तेरा दिवसांचा मुकेश यांना गळादाबून मारले आणि त्यांचे मृतदेह गाडले. पोलिसांनी 7 महिन्यांपूर्वी गाडलेल्या मृतदेहांचे पोस्टमॉर्टम घटनास्थळीच करावे अशी विनंती मेडिकल बोर्डाला केली. त्यानंतर पिंकीचा पती चंदनपुरी याला मृतदेह सोपवण्यात आले. पोलिसांनी मृतांचा व्हिसेरा आणि डीएनए सँपल जमा केले आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे.
पुढील स्लाइडमध्ये, आजीने केला होता पिंकीचा सांभाळ