आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोपेत असलेल्या पत्नी-मुलांवर कुऱ्हाडीने केले वार, नंतर टाकीत दिला जीव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंगणात खाटेवर झोपलेल्या पत्नी आणि मुलांवर त्याच अवस्थेत कुऱ्हाडीने वार केले. - Divya Marathi
अंगणात खाटेवर झोपलेल्या पत्नी आणि मुलांवर त्याच अवस्थेत कुऱ्हाडीने वार केले.
बाडमेर (राजस्थान) - शहरापासून 20 किलोमीटर अंतरावरील गावात 30 वर्षीय युवकाने रात्री 1 वाजता घराच्या अंगणात झोपलेल्या पत्नी आणि दोन निष्पाप मुलांवर कुऱ्हाडीने वार करुन त्यांची हत्या केली. त्यानंतर युवकाने स्वतः शेजारी असलेल्या पाण्याच्या टाकीत उडी घेऊन आत्महत्या केली. तिथेच झोपलेले युवकाचे वृद्ध वडील कर्णबधिर असल्याने रात्री आपल्या शेजारी काय घडले हे त्यांना कळालेच नाही. मंगळवारी सकाळी या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पती-पत्नीमध्ये पैशांवरुन भांडण झाले असल्याचे सांगितले जात आहे.
काय आहे पूर्ण प्रकरण
- मंगळवारी सकाळी पोलिसांना एका युवकाने पत्नी आणि दोन मुलांची हत्या करुन स्वतः आत्महत्या केल्याची माहिती मिळाली.
- त्यानंतर पोलिस आयुक्तांसह पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले.
- पोलिसांनी सांगितले, की सोमवारी मध्यरात्रीनंतर हनीफ खान याने अंगणात झोपलेली त्याची पत्नी फरीदा (28), दोन मुले आरिफ (3) आणि इक्बाल (9 महिने) यांच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार केले. या तिघांचा जागीच मृत्यू झाला.
- वार एवढे खोलवर होते की लहान मुलांचे शीर धडावेगळे होण्याची शक्यता होती.
तिघांची निर्घृण हत्या : तिघांवर कुऱ्हाडीने तीन वार, झोपत असलेली मुले आणि त्यांची आई हलूही शकले नाही
- पोलिसांनी सांगितले, की पैशांच्या शुल्लक कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर माथेफिरू युवकाने स्वतःच्याच पोटच्या मुलांच्या थेट गळ्यावर वार करुन त्यांची हत्या केली.
- घटनेवेळी त्याची पत्नी फरीदा आणि तीन वर्षांचा आरीफ एकाच खाटेवर झोपलेले होते. तर, नऊ महिन्यांचा इक्बाल शेजारच्या खाटेवर होता.
- हनीफने प्रथम फरीदाच्या मानेवर कुऱ्हाडीने वार केले, पहिल्याच झटक्यात तिचा गळा कापला गेला.
- त्यानंतर तिच्या कुशीत झोपलेल्या आरिफवर वार करतानाही त्याचे हात कापले नाही. दुसरीकडे झोपलेल्या फक्त 9 महिन्याच्या लहानग्या इक्बाललाही त्याने सोडले नाही.
- तिघेही जसे झोपलेले होते, त्याच अवस्थेत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना हलण्याचीही संधी हनीफने दिली नाही. अंगणांमध्ये रक्ताचे थारोळे साचले होते.
- ज्या कुऱ्हाडीने हनीफने तिघांवर वार केले ती पत्नीच्या खाटेजवळ टाकून त्याने टाकीत उडी घेऊन आत्महत्या केली.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनास्थळावरील विदारक दृष्य
>> पिता म्हणाला मला का सोडले...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...