आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीचे होते दुसऱ्या महिलेशी अवैध संबंध, पत्नीला कळाले तर केले असे हाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुरुक्षेत्र - वीज मंडळात कनिष्ठ अभियंता (जेई) असलेल्या विजय कुमारने पत्नी सीमा आणि सहा वर्षांचा मुलगा जश्न यांची उत्तर प्रदेशातील गागलहेडी येथे हत्या केल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार विजयकुमारच हत्यारा आहे. त्याला पत्नी आवडत नव्हती त्यामुळेच त्याने तिची हत्या करण्यासाठी मसूरी फिरायला जाण्याचा प्लॅन केला होता आणि रस्त्यात पत्नी व मुलाची निर्घृण हत्या केली.
जेईने रचला होता हत्येचा प्लॅन
- पिपली येथे पोस्टींग वीज महामंडळात जेई असलेला विजयकुमार यानेच पत्नी आणि मुलाला मारण्याचा प्लॅन केला होता. त्यासाठी तो त्यांना फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने मसूरीला घेऊन निघाला होता.
- सोमवारी रात्री विजयने अंधारात मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला, मात्र तो दारुच्या नशेत असल्यामुळे त्याला झोप लागली.
- सकाळी त्याचे डोळे उघडले तेव्हा लोकांनी त्याला पोलिसांच्या हवाली केले.
- पोलिस अधिकारी के.पी.सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने हत्या केल्याचे कबूल केले आहे.
- 10 वर्षांपूर्वी विजयचे सीमासोबत लग्न झाले होते. सीमाच्या मोठ्या बहिणीचे लग्न विजयच्या मोठ्या भावासोबत झालेले आहे. दोघी बहिणी एकाच घरात नांदत होत्या.
- पोलिस चौकशीत विजयने सांगितले की त्याला सीमा पसंत नव्हती. विजयला वीज मंडळातील नोकरी लग्नानंतरच लागली होती.
पुढील स्लाइडमध्ये पाहा नराधम पित्याने सहा वर्षांचा मुलाचा घेतला जीव
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...