आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

55 वर्षाच्या सासऱ्याने केले 33 वर्षाच्या सुनेबरोबर लग्न; म्हणाला नाईलाजास्तव उचलेले हे पाऊल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
55 वर्षाच्या निषादने आपल्या 33 वर्षीय सुन पन्नूसोबत विवाह केला आहे. - Divya Marathi
55 वर्षाच्या निषादने आपल्या 33 वर्षीय सुन पन्नूसोबत विवाह केला आहे.
गोरखपूर- एका 55 वर्षाच्या सासऱ्याने आपल्या 33 वर्षाच्या सुनेसोबत लग्न केल्याची घटना घडली आहे. शनिवारी ही बाब गावकऱ्यांना समजली. असे का केले याचे स्पष्टीकरण देताना या व्यक्तीने आपण नाईलाजास्तव हे पाऊल उचलल्याचे सांगितले.

जाणून घ्या काय आहे प्रकरण

- गोरखपूरपासून 25 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या चौरी-चौरा तालुक्यातील डीहघाट गावात ही घटना घडली आहे. येथे राहणाऱ्या निषाद या व्यक्तीने 13 जून रोजी आपल्या मोठ्या मुलाच्या पत्नीसोबत केले. निषादने आपली सून पुन्नू (वय 33) हिच्यासोबत एका मंदिरात गुपचुप लग्न केले. 
- शनिवारी ही बाब गावकऱ्यांना समजल्यावर तो म्हणाला की, हे लग्न मी नाईलाजास्तव केले आहे. माझ्या मोठ्या मुलाने दुसरे लग्न केले असून आपल्या सुनेला नवे जीवन देण्यासाठी आपण हे लग्न केले आहे. माझ्या मुलाच्या कृत्याबद्दल मला लाज वाटते.
- आपल्या मुलाने दुसरे लग्न केल्यानंतर इथे येणे-जाणे बंद केले आहे. माझ्या सुनेवर 4 मुलांची जवाबदारी आहे. माझी इच्छा आहे की तिने आपल्या जीवनात पुढे जावे यासाठी मी तिच्यासोबत लग्न केले. 

चार वर्षांपासून घरी आलेला नाही मोठा मुलगा 

- दिलीपने 2001 मध्ये पन्नू बरोबर विवाह केला होता. सुमन, बिंदू, गणेश आणि 2013 मध्ये जन्म झालेला शुभम अशी चार मुले त्याला आहेत. नोकरीसाठी बाहेरगावी गेलेल्या दिलीपने तिथेच दुसरे लग्न केले. निषादने दिलेल्या माहितीनुसार, तो 2013 नंतर घरी परतलेला नाही.
गाववाल्यांच्या म्हणण्यानुसार, सासरा-सुनेच्या संबधाबद्दल मुलाला होती शंका
- एकीकडे निषाद मुलगा यासाठी दोषी असल्याचे सांगत आहे तर गावकरी मात्र निषादला दोषी मानतात.
- रामशरण या गावकऱ्याने सांगितले की, दिलीप हा कामानिमित्त विविध शहरांमध्ये फिरत होता. या काळात निषाद आणि त्याच्या सुनेत संबंध प्रस्थापित झाले. एका त्याने त्यांना आपत्तीजनक स्थितीतही पाहिले होते. यावरुन त्यांच्यात भांडणेही झाली होती. 
बातम्या आणखी आहेत...