आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लज्जास्पद: घरात एकटीच होती मतिमंद मुलगी, वासनांध बापाने केला बलात्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
16 वर्षीय मतिमंद मुलगी घरात एकटीच होती. - Divya Marathi
16 वर्षीय मतिमंद मुलगी घरात एकटीच होती.
मुरादाबाद - एका बापाने पोटच्या मुलीलाच वासनेची शिकार बनवले. आरोपीच्या पत्नीने आरोप केला आहे की, तिच्या गैरहजेरीत त्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी नराधम बापाला अटक केली आहे. मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी तुरुंगात पाठवण्यात आले आहे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. 
 
असे आहे पूर्ण प्रकरण...
-मुरादाबादच्या मझोला एरियात राम्तालैयाचा रहिवासी जितेंद्र एका खासगी फर्ममध्ये काम करतो. मोठ्या मुलीचे लग्न झालेले आहे, तर लहान मुलगी (वय 16) मतिमंद आहे, तिच्यावर उपचारही सुरू आहेत.
- आरोपीच्या पत्नीने पोलिसांना माहिती दिली की, 16 ऑगस्ट रोजी ती बाजारात गेली होती, यादरम्यान जितेंद्रने लहान मुलीला दमदाटी करून बलात्कार केला. एवढेच नाही, त्याने दोनदा तिच्यावर बलात्काराचा प्रयत्नही केला.
- संध्याकाळी पीडितेची आई घरी पोहोचली तेव्हा मुलगी उदासवाणी बसलेली होती. खूप खोदून-खोदून विचारल्यावर ती म्हणाली की, पप्पाने माझ्यासोबत वाईट काम केले, हे ऐकून तिचे अवसानच गळाले.
- यानंतर लगेच तिने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी शनिवारी आरोपीला अटक केली असून पीडितेला मेडिकलसाठी रुग्णालयात पाठवले आहे.
 
काय म्हणतात पोलिस अधिकारी?
- मझोलाचे स्टेशन इन्चार्ज हरिश्चंद्र जोशी म्हणाले, पीडित मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दिली होती. सूचना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन केस दाखल केली असून कारवाई सुरू केली आहे.
 
पुढच्या स्लाइड्समये पाहा, आणखी काही PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...