आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Man Refuses To Marry Girl After Making Physical Relations In Agra

लव्ह-सेक्स-धोका: वरातीची वाट पाहात राहिली वधू, नाही आला धोकेबाज नवरदेव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तीन वर्षांपूर्वी रजिस्टर्ड मॅरेज केल्यानंतर फक्त शारीरिक शोषण करत राहिला तरुण. - Divya Marathi
तीन वर्षांपूर्वी रजिस्टर्ड मॅरेज केल्यानंतर फक्त शारीरिक शोषण करत राहिला तरुण.
आग्रा - लग्नाची सर्व तयारी झालेली. पंचायतीच्या धर्मशाळेत मंडप सजलेला. पाहुण्यांसाठी सुरुची भोजची व्यवस्था झालेली. मात्र ऐनवेळी वरपक्षाने 'हुंडा नाही तर वरात येणार नाही', असा पवित्रा घेतला. यामुळे रामप्रकाश यांची कन्या पुजा (नाव बदलले आहे) 26 एप्रिल रोजी नवरदेवाची फक्त वाटच पाहात राहिली. आता पूजाच्या कुटुंबियांनी मुलाकडील मंडळींना कडक शिक्षा कशी होईल याचे प्रयत्न सुरु केले आहेत.

लग्नाआधी युवक-युवतीचे होते शारीरिक संबंध
- प्रकरण अंतरजातीय विवाहाचे आहे.
- पीडित पूजाच्या म्हणण्यानुसार, चार वर्षापूर्वी तिची मैत्रिण अर्चना दुबेच्या लग्नात तिची हितेश मुरारी नावाच्या युवकासोबत ओळख झाली.
- हितेश नात्याने अर्चनाचा दिर लागतो.
- पहिल्या भेटीत दोघांना एकमेकांविषयी प्रेम निर्माण झाले आणि लवकरच त्यांच्या शारीरिक संबंध प्रस्थापित झाले.
- हितेश मुळचा आग्र्यातील एत्मादपूर मधील अहारन गावचा रहिवासी आहे. तो लिफ्ट मेटेनंसचे काम करतो.
- पूजाचे म्हणणे आहे की हितेशने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून शारीरिक संबंध ठेवले.
लपून केले होते रजिस्टर्ड मॅरेज
- पूजाच्या म्हणण्यानुसार, हितेश तिच्यासोबत नेहमी संबंध ठेवत असल्यामुळे तिने त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणला.
- पूजाला खूश करण्यासाठी त्याने 2013 मध्ये तिला कोर्टात नेऊन रजिस्टर्ड मॅरेज केले.
- मात्र त्याचवेळी तिला बजावले की कुटुंबियांना या लग्नाबद्दल सांगू नको. जेव्हा माझ्या घरचे लग्नाला तयार होतील तेव्हा आपण त्यांना रजिस्टर्ड मॅरेजबद्दल सांगू.
- कोर्ट मॅरेज झाल्यानंतर जणू काही त्याला परवानाच मिळाला होता. त्यानंतर तो पूजासोबत सतत शारीरिक संबंध ठेवू लागला.

अचानक दिली धमकी, 'माझा पिच्छा सोडून दे'
- दोघांचे लपून-छपून भेटणे सुरुच होते, सर्वकाही व्यवस्थित चालले आहे असे वाटत असताना एक दिवस अचानक पूजाची मैत्रिण अर्चना तिच्या घरी येऊन धडकली.
- अर्चनाने संपूर्ण कुटुंबाच्या समक्ष पूजाला खरी-खोटी सुनावत यापुढे माझा दीर हितेशचा पिच्छा करु नको असे बजावले.
- या घटनेनंतर संपूर्ण कुटुंबाला पूजा आणि हितेशच्या संबंधाबद्दल कळाले.
- पूजाने आईला अर्चनाच्या लग्नात झालेली हितेशची भेट ते रजिस्टर्ड मॅरेजपर्यंतची सर्व हकिकत सांगितली.

महिला आयोगाकडे मांडेल गाऱ्हाणे
- आपल्या मुलीकडून सर्व कथा ऐकल्यानंतर रामप्रकाश, हितेशचे वडील कृष्ण मुरारी यांच्याकडे त्या दोघांच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी गेले.
- मुलाकडील मंडळींनी रामप्रकाश यांना खालच्या जातीचे म्हणून हिनवले आणि आल्या पावली परत पाठवले.
- त्यानंतर पूजाच्या कुटुंबियांनी महिला आयोगाकडे आपले म्हणणे मांडले.
- महिला आयोगाने आग्रा पोलिस अधीक्षकांना तपासाचे आदेश दिले, त्यानंतर हे प्रकरण पोलिस दप्तरी दाखल झाले.
- 28 मार्चला महिला तक्रार निवारण पोलिस अधिकारी विपिन चौधरींनी दोन्ही पक्षांना एकत्र बसवून प्रकरण मिटवले.
- हितेशची आत्या मधू यांनी समजूत घातल्यानंतर दोन्ही कुटुंब शांत झाले आणि 26 एप्रिल रोजी पूजा - हितेशचे लग्न ठरले.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, लग्नाच्या दिवशी केली हुंड्याची मागणी, पाच लाख आणि एक गाडी... तरुणीच्या डोक्यावरचे छतही जाणार ...पोलिस काय म्हणाले ... बघा लग्नाची कशी केली होती तयारी...