अलवर - दीड वर्षांपूर्वीही ढगफुटीने पर्वत विरघळला होता. त्यावेळी त्याने ‘लीला’ला सामावून घेतले होते. हजारोंची ‘जीवन लीला’ संपवली. आता पर्वत पुन्हा विरघळला आहे. यावेळी ‘लीला’चा मार्ग दाखवला. १८ महिन्यांपासून हट्टाला पेटलेल्या एका पतीला जीवनसाथी पुन्हा भेटली.हा किस्सा आहे विजेंद्र सिंह कंवर व पत्नी लीला यांचा. ते १२ जून २०१३ ला बस घेऊन चारधामला गेले होते. १६ जूनच्या ढगफुटीत पत्नी बेपत्ता झाली पण विजेंद्रने आशा सोडली नव्हती.
१० लाख भरपाई, ६ लाख शोधात
विजेंद्रसोबत गेलेल्या ३० लोकांपैकी फक्त १३ जण घरी परतले. लीला यांच्यासह १७ जण बेपत्ता होते. त्यांना सर्वांना मृत मानून सरकारने त्यांच्या नातेवाइकांना प्रत्येकी १० लाख रुपये भरपाई दिली. विजेंद्र यांनी ती रक्कमही लीलाच्या शोधासाठी खर्च केली. ६ लाख रुपये खर्च झाले आहेत. इतर पैसे ते सरकारला परत देण्यास तयार आहेत.
लीलाचा फोटो घेऊन दीड वर्षे शोध घेतला. चौकशी केली. फोटोतील महिलेसारखी एक वेडी महिला गंगोली गावात दिसल्याची माहिती लोकांनी मंगळवारी त्यांना दिली. त्यांनी त्वरित गाव गाठले. पाहिले तर त्या लीलाच होत्या. ते आता त्यांना सोबत घेऊन आले आहेत. आता त्यांच्या उपचाराची तयारी सुरू आहे.
५ मुलांची आई, आता एखाद्या मुलीसारखी
लीला ४७ वर्षांच्या असून त्यांना ५ मुले आहेत. पण वेडामुळे जणू काही त्या एक मूल झाल्या आहेत. लोक त्यांना पाहायला येतात. त्यांच्याशी बोलतात. लीला ते ऐकतात. सर्वांकडे पाहून हसतात, पण काहीच बोलत नाहीत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा लीला यांचे घरी आल्यानंतरचे फोटो...