आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारुड्या पतीला दोन बायका, एकीशी भांडला अन् केले असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देवीलालने त्याच्या दुसऱ्या पत्नीचा गोळी घालून खून केला. - Divya Marathi
देवीलालने त्याच्या दुसऱ्या पत्नीचा गोळी घालून खून केला.
भिलवाडा (राजस्थान) - दारुडा नवरा आणि दोन बायका असल्यावर घरात कटकटी होणारच. रोजच्या या खटक्यांचे पर्यवसान मोठ्या वादात झाले अन् दारुड्या नवऱ्याने दुसऱ्या बायकोला थेट गोळी घालून ठार केले. 
 
असे आहे प्रकरण
येथे एका पतीने त्याच्या दुसऱ्या बायकोचा गोळी मारून खून केला. यानंतर तो जवळच्याच तळ्यात उडी मारली, ज्यामुळे त्याचाही मृत्यू झाला. पाणबुड्यांनी कित्येक तास शोध घेतल्यावर त्याचा मृतदेह आढळला.
- भिलवाडा शहरातील बिजौलियां परिसरातील हे प्रकरण आहे. येथे सतकुडियां गावात राहणारी झुझी भिल हिला एका क्षुल्लक भांडणानंतर पती देवीलाल भिलने गोळी मारली. गोळी लागल्याने जागीचा तिचा मृत्यू झाला. यानंतर पती देवीलालने खदानीत उडी मारून जीवन संपवले. घटनेत पती-पत्नी दोघांचाही मृत्यू झाला आहे. पोलिस सध्या प्रकरणाचा तपास करताहेत.
 
एक पत्नी गेली माहेरात
- देवीलालने दोन लग्ने केली होती. पहिली पत्नी काही कामानिमित्त माहेरात गेली होती, तर छोटी घरीच होती. यादरम्यान घरगुती भांडणातून पतीने संतप्त होऊन दुसऱ्या बायकोला थेट पिस्तुलातील गोळीच मारली. देवीलालला दारूचे व्यसन होते. तो नेहमीच दोन्ही बायकांशी भांडणे करायचा असे शेजारी पोलिसांना म्हणाले.
- पोलिसांनी याप्रकरणी प्रकरणाची नोंद केली असून अधिक तपास सुरू असल्याचे म्हटले आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...