आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेलंगणा राष्‍ट्र समितीच्या बैठकीत घेतले तेलंगणासाठी विष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करीमनगर (आंध्र प्रदेश) - स्वतंत्र तेलंगणा आंदोलनात सक्रिय एका कट्टर कार्यकर्त्याने गुरुवारी ‘टीआरएस’च्या बैठकीतच विष घेऊन आत्महत्या केली. पक्षाचे अध्यक्ष के. चंद्रशेखर यांचे भाषण सुरू असतानाच त्याने विष घेतले. सूर्यपल्ली गावात ही बैठक सुरू होती. गुंडा नागाराज (32) हा कार्यकर्ता अचानक व्यासपीठाकडे निघाला. इतरांनी त्याला थांबवले तेव्हा व्यासपीठामागे जाऊन त्याने कीटकनाशक प्राशन केले.

‘जय तेलंगणा’ अशी घोषणाही त्याने दिली. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. यापूर्वी तेलंगणासाठी नागाराज एका मोबाइल टॉवरवर चढला होता. त्या वेळीही त्याने आत्महत्येची धमकी दिली होती. मात्र, समजूत काढल्यावर तो खाली उतरला होता.