आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Man Throws Daughter Into A River From A Running Train After Conflict With Wife

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मद्य पिण्यास विरोध केल्याने दारुड्या प‍ित्याने धावत्या रेल्वेतून चिमुकलीला फेकले नदीत!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोटा- रेल्वेतून प्रवास करताना पत्नीने मद्य सेवन करण्‍यास विरोध केल्याने दारुड्या पतीने आपल्या दोन वर्षीय चिमुरडीला धावत्या गाडीतून चंबळ नदी‍त फेकल्याची घटना उघडकीस आली. शनिवारी (21 जून) रात्री कोटा जिल्ह्यातील गुडला स्टेशनजवळ ही घटना घडली. आरोपी पित्याला पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी (23 जून) सकाळी चिमुरडीचा मृतदेह नदीत आढळून आले.
जीआरपी सीआय संजय शर्मा यांनी सांगितले, की खदायला (भरतपूर) येथील रहिवासी गुर्जरमल उर्फ गौरव हा शनिवारी रात्री पत्नी सोनू आणि दोन नायुषी (2) आणि नऊ महिन्यांची आयुषी यांच्यासोबत हल्दीघाटी एक्सप्रेसने बयाना येथे जात होता. गौरव हा प्रवासादरम्यान मद्य सेवन करत होता. परंतु, पत्नी सोनूने त्याला मद्य सेवन करण्यास विरोध केला. यावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. रात्री 8 वाजेच्या दरम्यान रेल्वे गुडला स्टेशनजवळ आली असता. गौरव त्याच्या मोठ्या मुलीला (नायुषी) दरवाज्याजवळ घेऊन गेला.गाडी चंबळ नदीच्या पुलावरून जात असताना गौरव याने नायुषीला नदीत फेकून दिले. शेजारी उभ्या असलेल्या मुलीने गौरवला मुलीला नदीत फेकताना पाहून ती ओरडली आणि अन्य प्रवाशांना याबाबत माहिती दिली.

अन्य प्रवाशांनी साखळी ओढून गाडी थांबवली. गाडी थांबताच आरोपी गौरव रेल्वेतून खाली उतरला. नंतर काही मिनिटात गाडी कोटा स्टेशनवर पोहोचली. जीआरपीच्या जवानांना घटनेची माहिती दिली. सोनू ही देखील तिच्या नऊ महिन्यांच्या मुलीसह पोलिस ठाण्यात आली. पोलिसांनी चंबळ नदीत मुलीचा रात्रभर शोध घेतला. दरम्यान गुडला स्टेशनजवळ आरोप गौरव याला पो‍लिसांनी अटक केली. अखेर रविवारी सकाळी मुलीचा मृतदेह नदीचून बाहेर काढण्यात आला.
(फोटो कॅप्शन: नदीतून बाहेर काढलेला नायुषीचा मृतदेह)

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, पतीने पत्‍नीला दुसर्‍या मजल्यावरून फेकले...