आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Man Throws Shoes Towards CM Nitish Kumar To Oppose Liquor Ban

बिहार : दारुबंदीच्या निर्णयावर नाराज व्यक्तीने नितीशकुमारांवर फेकला बूट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर बूट फेकलेल्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. - Divya Marathi
मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर बूट फेकलेल्या तरुणाला पोलिसांनी अटक केली.
पाटणा - पाटणा जिल्ह्याच्या बख्तियारपूरमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार दारुबंदीवर भाषण देत होते, त्याचवेळी समोरच्या रांगेत उभ्या असलेल्या एकाने त्यांच्या दिशेने बूट भिरकावला. त्याने फेकलेला बूट व्यासपीठापर्यंत पोहोचण्यापूर्वीच जमिनीवर पडला. या घटनेच्यावेळी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हुड्डादेखिल व्यासपीठावर उपस्थित होते. समस्तीपूरचा राहणारा प्रवेश राय नावाचा हा व्यक्ती दारुबंदीचा विरोध करत होता. त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सांगितले जात आहे.

बूट फेकणारा पोलिस कोठडीत...
- मुख्यमंत्री नितीशकुमार लोकांना दारु सोडण्याची विनंती करत होते. त्याचवेळी एका व्यक्तीने बूट काढला आणि व्यासपीठाकडे भिरकावला.
- या घटनेने काहीवेळासाठी गोंधळ पसरला होता. पोलिसांनी बूट फेकणाऱ्याला ताब्यात घेतले.
- पोलिस या व्यक्तीला पकडत होते त्याचवेळी नितीश यांनी त्याला सोडायला सांगितले. तसेच त्याला तू दारु पितोस का अशी विचारणाही केली.

मी घाबरणार नाही...
- स्वातंत्र्यसैनिक शीलभद्र याजी यांच्या जयंती सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नितीश बख्तियारपूरला पोहोचले होते.
- सभेत नितीश म्हणाले की, एक एप्रिलपूर्वी तुम्ही दारु सोडून द्या अशी माझी विनंती आहे.
- तशीही 1 एप्रिलपासून दारु मिळणार नाही. आम्ही निर्णय घेतला आहे.
- 31 मार्चनंतर जी देशी दारु शिल्लक राहील, तीही पिण्यायोग्य नसेल. खासगी दुकानांमध्ये असलेली परदेशी दारी सरकारी कंपन्या खरेदी करतील.
- अशा घटनांनी मी घाबरणार किंवा थांबणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
- मी 'नितीश निश्चय' चे इतर सहा निर्णयही पूर्ण ताकदीने मार्गी लावणार आहे. राज्यात 1 एप्रिलपासून दारुबंदी होईलच.

नितीशच्या निर्णयाने होता नाराज
- महिलांच्या मागणीवरून नितीश कुमारने दारुबंदी केल्याने बूट फेकणारा व्यक्ती नाराज होता, असे सांगितले जात आहे.
- सभा सुरू झाली तेव्हापासूनच तो दारुबंदी आणि महिलांना दिलेल्या आरक्षणाचा विरोध करत होता.
निवडणूक प्रचारावेळीही नितीश कुमारांना दाखवल्या होत्या चपला
- बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान 29 सप्टेंबरला नितीश नवादामध्ये सभेत बोलत असताना त्यांच्या सभेत काही जणांनी मोदी मोदीच्या घोषणा गेत चपलाही दाखवल्या होत्या.
- या घोषणाबाजीमुळे नितीश कुमारांना बोलण्यात अडचण येत होती, त्यामुळे त्यांना काहीवेळासाठी भाषण थांबवावे लागले होते.
पुढील स्लाइडवर पाहा, कार्यक्रमातील PHOTO