आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायकोवर देहव्यापाराची बळजबरी केली नवऱ्याने, नकार दिल्याने केले असे हाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीडित विवाहिता सीतारून निशाचे लग्न 4 महिन्यांपूर्वीच झाले होते. - Divya Marathi
पीडित विवाहिता सीतारून निशाचे लग्न 4 महिन्यांपूर्वीच झाले होते.
वाराणसी - शहराच्या मंडुआडिह परिसरात एका नवऱ्याचा राक्षसीपणा समोर आला आहे. पीडित महिलेचा आरोप आहे की, तिचा नवरा तिला धंदा करायला सांगायचा. मनाई केल्यावर शरीराच्या नाजूक अवयवांवर हंटरने वार करायचा. एवढेच नाही, जीभ आणि गाल यासारख्या नाजूक अंगांवर दातांनी चावायचाही. महिलेला गंभीर परिस्थितीत कबीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर आरोपी मात्र फरार झाला.
 
असे आहे प्रकरण...
- पीडित सीतारून निशा म्हणाली, माझे लग्न 4 महिन्यांआधीच 9 एप्रिल 2017 ला हिंमतपूरच्या गालिचा विणणाऱ्या जफरसोबत झाले होते.
- सुरुवातीला सगळे ठीकठाक सुरू होते. काही दिवसांनी जफर म्हणायला लागला की, लग्नात माझ्यावर बरेच कर्ज झाले आहे, ते सर्व तू 'धंदा' करून फेड.
- यानंतर मला मारहाण करायला लागला. म्हणायचा, तुझ्या बापाकडून पैसे घेऊन ये, नाहीतर वेश्या बनून जा. गिऱ्हाईक मी घेऊन येतो. तू फक्त 'धंदा' करून कमव. हळूहळू त्याचा अत्याचार वाढत गेला. 
- हुंड्याविषयी विचारून काही दिवसांपूर्वी तो मला म्हणाला, "दोन जण येतील आणि तुझ्यासोबत झोपतील. ते काहीही करतील तू मना करू नकोस." मी चिडून नकार दिला तर त्याने रागाच्या भरात माझ्या गाल, जीभ आणि नाजूक अवयवांवर दातांनी चावा घेतला. छातीवर बसून 4 तास लगातार मारहाण केली आणि न्यूड करून तिखट स्प्रे माझ्यावर फवारला.
- मागच्या 20 दिवसांत त्याने मला मोठ्या केबलचा हंटर बनवून बेदम मारहाण केली. दिवसातून 3-3 तास तो मला मारायचा. मी बेशुद्ध झाले की पाणी शिंपडून उठवायचा. आणि पुन्हा मारायला लागायचा.
- इकडे दोन दिवसांपासून त्याचा अत्याचार इतका वाढला की त्याने चाकूने माझे डोके, पाय, हाताचे पंजे रक्तबंबाळ केले. 
- एवढे होऊनही त्याचे मन भरले नाही तर त्याने छातीवर उभे राहून पायांनी तुडवणे सुरू केले. एवढ्या मारहाणीमुळे माझे शरीर काळेनिळे पडले आहे.
 
काय म्हणतात पोलिस?
- एसओ नागेंद्र म्हणाले, पीडित महिलेचा भाऊ सब्बीर याने आपल्या भाउजीविरुद्ध हुंडाबळीची तक्रार दिली आहे. प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. कौटुंबिक न्यायालयात हा खटला चालणार आहे. आरोपी नवऱ्याला लवकरच नोटीस पाठवण्यात येईल. सध्या आरोपी फरार आहे.
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...