आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वर्गरथामध्ये जिवंत झाला मृतदेह, म्हणाला- हरि ॐ, मला कुठे घेऊन चाललात?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉक्टरांनी मृत घोषित केल्यावर 5 तासांनी माेटूमल जिवंत झाले. - Divya Marathi
डॉक्टरांनी मृत घोषित केल्यावर 5 तासांनी माेटूमल जिवंत झाले.
भोपाळ - भोपाळच्या बैरागढमध्ये राहणारे 76 वर्षीय मोटूमल वासवानी मेल्यानंतर तब्बल 5 तासांनी जिवंत झाले. ही खळबळजनक घटना घडली तेव्हा कुटुंबीय त्यांच्या अंत्यसंस्कारांची तयारीच करत होते. त्यांचा मृतदेह रुग्णालयातून स्वर्गरथातून घरी आणण्यात येत होता. तेवढ्यात अचानक ते उठून बसले आणि सिंधी भाषेत म्हणाले, "हरी ऊँ... मुख्खे कैडा ता खणी हलो ता'" (हरी ओम मला कुठे घेऊन चाललात?) 
 
असे आहे पूर्ण प्रकरण...
- मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळच्या बैरागढमध्ये राहणारे 76 वर्षीय मोटूमल 200 संस्थांमध्ये पदाधिकारी आहेत. वासवानी यांना 6 सप्टेंबर रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्यांच्यावर भोपाळच्या चिरायू रुग्णालयात उपचार करण्यात आले. सोमवारी अचानक त्यांची तब्येत जास्त बिघडली आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मंगळवारी सकाळी 7 वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते.
- यानंतर कुटुंबीयांनी नातेवाइकांना मोटूमल वासवानी यांच्या निधनाची माहिती दिली. हे कळताच शेकडो लोक मोटूमल वासवानी यांच्या घरी पोहोचले होते. त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारीही सुरू झाली होती. अर्थी सजवण्यात आली. अंतिम क्रियासाठी घरासमोर मडक्यात धूरही करण्यात आला. स्मशानात अंत्यसंस्कराच्या जागी लाकडेही टाकण्यात आली होती.
- काही नातेवाईक बाहेरगावाहून येणार होते, यामुळे अंत्यसंस्काराची वेळ दुपारी 2 वाजता ठेवण्यात आली. इकडे घरीही नातेवाईक आणि ओळखीचे रुग्णालयातून मृतदेह येण्याची वाट पाहत होते. दरम्यान, रुग्णालयातील जरूरी कार्यवाही नंतर मोटूमल यांचा मृतदेह स्वर्गरथात ठेवून घरी आणण्यात येत होता. स्वर्गरथ बैरागढच्या चंचल चौकात पोहोचला तेवढ्यात मोटूमल उठून बसले आणि म्हणाले- "हरी ऊँ... मुख्खे कैडा ता खणी हलो ता'" (हरी ओम मला कुठे घेऊन चाललात?) 
- हे पाहून स्वर्गरथात बसलेले परिचित चकित झाले आणि त्यांना लगेच घरी घेऊन गेले. घरीच उपस्थित असलेल्या डॉ. शीतल बालानी यांनी त्यांचे चेकअप केले आणि त्यांना लगेच एलबीएस रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...