इंदूर - इंडस्ट्रीने तसे मला बरेच काही शिकवले आहे. पण त्यापैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे, "लर्न टू लिव्ह युवर प्रेझेंट'. मला इंडस्ट्रीत 20 वर्षे झाली आहेत. एवढ्या वर्षांच्या अनुभवावरून हेच लक्षात येते की, भूतकाळ आणि भविष्याच्या गोंधळातून बाहेर येत वर्तमानात जगणे अत्यंत कठीण आहे. ती सर्वात मोठी साधना आहे. माझ्यासाठी तर मेडिटेशनचा सर्वात चांगला प्रकार हाच आहे. मलाही त्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली. मीही पूर्वी भूतकाळ आणि वर्तमान काळाच्या गोंधळात अडकायचे. पण अॅक्टींगने माझी जीवनाकडे पाहण्याची दृष्टीच बदलून टाकली.
एका पानाचे माफीपत्र...
माझा भाऊ IIM आहमदाबादमधून पासआऊट आहे. मीही IIM साठी प्रयत्न केला होता. पण नापास झाले. त्यानंतर मी मीडिया एज्युकेशन केले. अॅड गुरू पीयूष पांडे यांच्याबरोबर काम करण्याचे स्वप्न होते. ते सत्यातही उतरले. त्याचवेळी शांती नावाच्या सिरिअलची ऑफर मिळाली. मी त्यांना एका पानाचे माफीपत्र पाठवले. एका वर्षानंतर पुन्हा तुमच्याबरोबर काम करेन असे त्यांना सांगितले. आजही जेव्हा ते भेटतात तेव्हा म्हणतात की, आजही मी एक वर्ष संपण्याची वाट पाहत आहे.
मी फिटनेस ट्रेनिंगसाठी ट्रेनर्सची मदत घेणे अनेक वर्षांपूर्वीच बंद केले होते. मी स्वतःसाठी काही वर्कआऊट डेव्हलप केले आहेत. माझ्या घरच्या जिममध्ये मी 40 मिनिटे वर्कआऊट करते. त्यादरम्यान एका मिनिटाचाही ब्रेक घेत नाही. 5 मिनिट कार्डियो तर पाच मिनिट वेट ट्रेनिंग करते. त्यासाठीचे काही पॅटर्नखालीलप्रमाणे आहेत.
>5 मिनिट सायकलिंग + 5 मिनिट बायसेप्स
>5 मिनिट ट्रेडमिल + 5 मिनिट आर्म्स
>5 मिनिट स्किपिंग + 5 मिनिट लेग्स
>5 मिनिट रनिंग + 5 मिनिट अॅब्स
'रिस्पेक्ट' इज बेस्ट आर्ट ऑफ लिविंग'
कोणत्याही व्यक्तीच्या जीवनाता त्याचे झालेले पालन पोषण आणि त्याला मिळालेली संस्कारांची शिदोरी हे सर्वात जास्त महत्त्वाचे असते. मला चांगले आईवडिल मिळाले हे मी माझे सुदैव समजते. माझ्या वडिलांनी नेहमी सर्वांना आदर केला. मलाही तेच शिकवले. आदर केला तरच तुम्हाला आदर मिळतो असे त्यांचे म्हणणे होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, मंदिरा बेदीचे फोटो...