जयपूर - मोरपंखांच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार बेकायदा ठरवण्यात राजस्थानातील जैन समाज मोठा अडसर ठरत आहे, असे केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी म्हटले आहे. ही मोहीम बंद करण्यासाठी
आपल्याकडे असंख्य निवेदने आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. जैन समाजात मोरपंखांपासून हातातील पंखे बनवले जातात. सध्याच्या कायद्यानुसार मोरपंखांचा व्यवहार परवान्यावरून केला जातो. परंतु त्याआडून मोरांची शिकार केली जात आहे. मोरांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. मोरपंखांची विक्री थांबवण्याची गरज बोलून दाखवतानाच मनेका यांनी धार्मिक धारणा सोडण्याचे आवाहनही केले आहे.
पशुहत्येचा पैसा दहशतवादाला : भारतात बेकायदेशीररीत्या होणाऱ्या पशूहत्यांच्या पैशातून दहशतवादासाठी चंदा पाठवला जात आहे. जगात मांसाची सर्वाधिक बेकायदा निर्यात भारतातूनच होते, असेही मनेका यांनी म्हटले आहे.