आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानेसरच्या कारखान्यात रोबोने घेतला एक बळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुडगाव- एका ऑटो अॅन्सिलरी कारखान्यात रोबोटिक आर्मच्या पकडीत आल्याने २४ वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. ही बुधवारची घटना आहे. उन्नाव येथील रामजी लाल हा धातूचा पत्रा अॅडजस्ट करण्यासाठी रोबोच्या खूपच जवळ गेला होता. तेथेच तो त्याच्या पकडीत आला. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. असाच अपघात जर्मनीतही झाला होता.
या घटनेनंतर उद्योगपतींनी गुरुवारी सुरक्षेचा आढावा घेतला. रोबोटिक्स मशीनवर काम करणाऱ्यांना नियमांनुसार काम करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. सध्या फरिदाबाद आणि पलवलमधील ३५ मोठ्या कंपन्यांत एक हजारपेक्षा जास्त रोबो काम करत आहेत. ऑटो कॉम्पोनंट तयार होत असताना हे रोबो वेल्डिंगचे काम करतात. एक रोबो ८-१० लोकांचे काम करतो. तो ४०-५० सेकंदांत वेल्डिंग करतो. त्यामुळे रोबोकडून काम करून घेण्याचे प्रकार वाढत आहेत.