आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mangalore Cops Throw Women Out Of Party After Alleged Bajrang Prod

बंगळुरु : पोलिसांवर आरोप, बजरंग दलाच्या दबावात तरुणींना पार्टीतून हुसकावले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्मक छायाचित्र - Divya Marathi
प्रतिकात्मक छायाचित्र
बंगळुरु - मंगलौर पोलिसांवर आरोप करण्यात येत आहे, की त्यांनी बजरंग दलाच्या सांगण्यावरून डिस्कोमध्ये डांस करत असलेल्या तरुणींना बळजबरीने तेथून हुसकावून लावले. मात्र पोलिसांनी या आरोपांचे खंडन केले आहे. ते म्हणाले, पार्टी आयोजकांने परवानगी घेतली नव्हती, त्यामुळे कारवाई करण्यात आली.
शनिवारी येथील एका थ्री-स्टार हॉटेलमध्ये पार्टी सुरु होती ती पोलिसांनी हस्तक्षेप करुन थांबवली. पोलिसांनी पार्टीसाठी आलेल्या सर्व महिलांना बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर पोलिसांवर आरोप करण्यात येत आहे, की त्यांनी बजरंग दलाच्या दबावात येऊन कारवाई केली आहे.
बजरंग दलाने पोलिसांचे केले अभिनंदन
इंग्रजी वेबसाइट हिंदूस्थान टाइम्सच्या वृत्तानूसार, बजरंग दलाचे प्रदेशाध्यक्ष शरद पुंपवैल यांनी पोलिस कारवाईचे स्वागत करत पोलिसांचे अभिनंदन केले आहे. शरद म्हणाले, 'या कारवाईसाठी पोलिसांचे अभिनंदन केले पाहिजे. आधी ते आम्हाला सहकार्य करत नव्हते, मात्र काही महिन्यांपासून ते बदलले आहेत.'
अनोळखी लोकांसमोर नाचणे आमची संस्कृती नाही
2009 मध्ये एका पबवर झालेल्या हल्ल्यात श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांवर महिलांची छेडछाड केल्याचा आरोप झाला होता, त्याचा उल्लेख करुन ते म्हणाले, जेव्हा आम्ही महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदा हातात घेतो तेव्हा आमच्यावर टीका होते. यावेळी आम्ही कायद्याचे पालन केले. पोलिसात तक्रार दिली. डांस पार्टीज् ड्रग्ज, सेक्स माफिया आयोजित करतात. शेकडो अनोळखी लोकांसमोर नाचणे ही भारतीय संस्कृती नाही.