आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mangalyaan News In Marathi, Indian Mars Mission, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंगळयान : कक्षेत बदल करण्याच्या प्रयत्नात शास्त्रज्ञ. वाचा..

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळयान सध्या फिरत असलेली कक्षा बदलली जात आहे. यान मंगळापासून सर्वात जवळ ४२१७ किमी आणि सर्वात लांब ७६,९९३.६ किमी अंतराच्या कक्षेत परिक्रमा करत आहे. शास्त्रज्ञ यात बदल करून याआधी ठरवलेल्या ४२३ किमी आणि ८० हजार किमीच्या कक्षेत स्थापन केले जाईल. यानाचा कलर कॅमेरा सुरू करण्यात आला आहे. त्याने बुधवारी पहिले छायाचित्र पाठवले आहे. यानाचे उर्वरित पेलोड्स २७ सप्टेंबरला सुरू केले जातील.
इस्रो प्रमुखांचे अभिनंदन करताना पंतप्रधान मोदी

दिल्लीतील ऑटोपेक्षा स्वस्त मंगळयानाचा प्रवास
देशाची पहिली मंगळ मोहीम मंगळयानावर जवळपास ४५० कोटी रुपये खर्च आला. हा प्रति किलोमीटरच्या हिशेबाने ऑटोच्या प्रवासापेक्षा कमी आहे. दिल्लीमध्ये प्रति किमी ऑटोचे भाडे आठ रुपये आणि मुंबईमध्ये जवळपास दहा रुपये प्रति किमी आहे. जवळपास ६५ कोटी किमी अंतर कापल्यानंतर यान मंगळापर्यंत पोहोचले. याच पद्धतीने याचा प्रति किमी खर्च जवळपास सात रुपये होतो.

यानाशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घ्या
* यानाचे वजन जवळपास १३५० किलोग्रॅम आहे. साधारण दोन लहान कारच्या वजनासमान.
* मंगळयानाने ६५ कोटी किमी प्रवास केला आहे. भारतीय रेल्वेकडे जवळपास १.१५ लाख किमी रेल्वे मार्ग आहे. मंगळाएवढा प्रवास करण्यासाठी १.१५ लाख किमीच्या रुळावर ५६५२ फे-या लागतील.
* यानाकरिता साधारण ४५० कोटी रुपये खर्च झाला. मुकेश अंबानींचे घर अँटिलियाच्या खर्चाचा हा दहावा भाग आहे. दिवाळीत ५००० कोटी रुपयांचे फटाके फोडले जातात. २००४ पासून पंतप्रधानांच्या परदेश दौ-यांवर ६४० कोटींचा खर्च झाला आहे. पटेल यांचा पुतळा बनवण्यासाठी २५०० कोटी खर्च होतील.

श्वास रोखणारी ३० मिनिटे
सकाळी ७.१७ वा. : द्रवरूप इंजिन सुरू झाले. यानाला कक्षेत स्थापन करण्यात आले.
7.21 वा. : मंगळाच्या मागे यान गेले. इस्रोचा संपर्क तुटला व अमेरिकी संस्था नासाशी जोडला गेला.
7.30 वा. : नासाने इंजिन सुरू असल्याचा दुजोरा दिला. ११ मिनिटांनी इंजिन बंद झाले.
7.47 वा. : यानाशी इस्रोचा पुन्हा संपर्क. नियंत्रण कक्षातून यशाची घोषणा.
सहा महिन्यांची मोहीम
१. मंगळाच्या वातावरणामध्ये पाणी नष्ट हाेण्याच्या कारणांचा शोध घेतला जाईल.
२. जीवसृष्टीची शक्यता तपासण्यासाठी मिथेन शोधणार
३. मंगळावरील धातूंच्या मिश्रणाचा शाेध घेतला जाईल. तापमान तपासणार.
४. मंगळाचा पृष्ठभाग आणि तेथील वातावरणाची छायाचित्रे घेतली जातील.

ट्विटर : तर मंगळवारी साप्ताहिक सुटी होईल
* मंगळ मोहिमेच्या यशानंतर आता शनिवार-रविवारनंतर मंगळवारीही साप्ताहिक सुटी जाहीर केली पाहिजे. @खबरबाजी
* ज्यांचे यान मंगळाभोवती फिरत आहे अशा भारताला शुभेच्छा. मी ब्रह्माला एवढे आनंदी कधी पाहिले नाही. या आनंदामुळे त्यांच्या आठही डोळ्यांतून आश्रू येत आहेत.
@द ट्विट ऑफ गॉड
* ब्रेकिंग न्यूज! चीनने लडाखवरून आपले लक्ष काढून घेतले आहे. आता ते भारताचे नवीन क्षेत्र मंगळयानावर लष्कर पाठवण्याच्या विचारात आहे.@सुदर्शन
* यशस्वी मंगळ मोहिमेला पाकिस्तान आपल्या पद्धतीने उत्तर देईल. आता पािकस्तानमध्ये विज्ञानाची पुस्तके बदलली जात आहेत, त्यातील सूर्यमंडळात सातच ग्रह आहेत. @इंडिया स्पीक्स

वर्ल्ड मीडिया
न्यूयॉर्क टाइम्स(अमेरिका)
कमी खर्चात एवढे मोठे उड्डाण, गौरवास पात्र
भारतीय शास्त्रज्ञांनी एवढ्या कमी खर्चात प्राप्त केलेले यश कौतुकास्पद आहे. संपूर्ण देशातील मुलांना सकाळी ६.४५ वाजता कार्यक्रम पाहण्यासाठी बोलावण्यात आले होते. ते योग्यच होते. कारण, भारताने आम्हाला, रशिया, युरोपीय संघ, चीन आणि जपानला मागे टाकले आहे.
ग्लोबल टाइम्स (चीन)
भारताच्या यशातून मानवतेचे कल्याण होईल
चिनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग म्हणाल्या, आम्ही भारताचे या यशाबद्दल अभिनंदन करतो. ही आशियासाठी अभिमानास्पद बाब आहे. भारतीय शास्त्रज्ञ या यशाचा उपयोग भविष्यात मानवतेच्या कल्याणासाठी करतील, अशी आम्ही आशा करतो. आम्ही भारताच्या विकासामध्ये त्यांच्यासोबत आहोत.
द टेलिग्राफ (ब्रिटन)
पहिल्या प्रयत्नात यश, भारताचे अभिनंदन
जगात आपण सर्वोत्कृष्ट आहोत हे भारतीय शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे. एवढ्या कमी स्त्रोतांत त्यांनी साध्य केलेले यश अन्य अनेक देशांना गाठता आले नाही. आम्ही सर्वांनी भारताच्या या कार्यपद्धतीतून शिकले पाहिजे.

यशाची पावले
१. मंगळयान उड्डाण : १३५० किलो वजनी मंगळयान गेल्या वर्षी ५ नोव्हेंबर रोजी पीएसएलव्ही अग्निबाणाने श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित केले.
२. दिशादर्शक प्रणालीची तपासणी: आवश्यक गती देण्यासाठी सात नोव्हेंबरपासून १६ नोव्हेंबरदरम्यान सहा वेळा मंगळयानाच्या दिशा प्रणालीची चाचणी घेतली.
३. सूर्याच्या कक्षेत पाठवले : एक डिसेंबरला मंगळयान सूर्याच्या कक्षेत स्थापन झाले. ४ डिसेंबरलला पृथ्वीच्या प्रभाव क्षेत्रातून बाहेर पडले.
३. १०० दिवस पूर्ण : मंगळयानाने अंतराळात या वर्षी १२ फेब्रुवारी रोजी १०० दिवस पूर्ण केले.
५. अर्धा प्रवास पूर्ण : संतुलित गतीतून मंगळाकडे निघालेल्या मंगळयानाने ९ एप्रिलपर्यंत अर्धा प्रवास पूर्ण केला.
६ कमांड लोड केले : वेळेवर संगणकाने काम सुरू करावे यासाठी १४-१५ सप्टेंबर रोजी यानात सर्व कमांड लोड केले.
७. इंजिन सुरू करणे : २२ सप्टेंबर रोजी द्रवरूप इंजिन ३०० दिवसांनंतर चार सेकंदासाठी सुरू करण्यात आले.
8 लक्ष्य गाठले