आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Manglor News In Marathi, Kudroli Gokarnanatheshwar Temple, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मागास विधवा मंदिरात पुजारी! कुद्रोली गोकर्णनाथेश्वर मंदिराचे महाराष्ट्राच्या पावलावर पाऊल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगलोर - अनुसूचित जाती, जमातीच्या दोन विधवा महिलांची पुजारीपदी नियुक्ती करून कुद्रोली गोकर्णनाथेश्वर मंदिराने सामाजिक सुधारणांच्या दृष्टीने सोमवारी आणखी एक पाऊल पुढे टाकले. अशी नियुक्ती करणारे ते देशातील पहिले मंदिर ठरले आहे. गेल्या वर्षीही या मंदिराने दोन विधवा महिलांची पुजारीपदी नियुक्ती केली होती. तेव्हापासून त्या येथे पूजा आणि धार्मिक विधी पार पाडत आहेत. विशेष म्हणजे पंढरपुरातही गेल्या काही दिवसांपूर्वी महिला पुजा-यांची नियुक्ती करण्यात आली होती.

रानीपूर येथील चंद्रावती आणि चिलिंबी येथील लक्ष्मी अशी या दोन महिला पुजा-यांची नावे आहेत. मंदिराच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य तसेच माजी केंद्रीय मंत्री बी. जनार्दन पुजारी यांनी या दोघींचे प्रवेशद्वारावर स्वागत केले. त्यांना मिरवणुकीने मंदिर परिसरात नेण्यात आले. त्यानंतर त्यांनी पूजा केली आणि भाविकांना प्रसादाचे वाटप केले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समाज सुधारक श्री नारायण गुरू यांनी १९१२ मध्ये या मंदिराची स्थापना केली होती. ईश्वराच्या दृष्टीने सर्व जण समान असून सर्वांना समान हक्क आहेत. मंदिरातही या तत्त्वांचे पालन व्हावे, असी त्यांची शिकवण होती. तिचेच पालन करण्यात आले, अशी प्रतिक्रिया जनार्दन पुजारी यांनी यावेळी व्यक्त केली.