आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मणिकर्ण साहिब गुरुद्वाराच्या इमारतीवर दरड कोसळून आठ ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दरडी कोसळल्याने सहा मजली इमारतीचे मजले एका रेषेत असे कापले गेले. - Divya Marathi
दरडी कोसळल्याने सहा मजली इमारतीचे मजले एका रेषेत असे कापले गेले.
मणिकर्ण (कुल्लू) - हिमाचलप्रदेशात शीख समाजाचे प्रमुख धार्मिक स्थळ असलेल्या मणिकर्ण साहिब गुरुद्वाराच्या मजली इमारतीचा बहुतांश भाग भूस्खलनामुळे मंगळवारी कोसळला. यात भाविकांचा मृत्यू झाला, तर ११ जण जखमी आहेत. अद्याप २५ लोक बेपत्ता आहेत. मंगळवारी दुपारी कुल्लू जिल्ह्यात ही दुर्घटना घडली.

मागच्या बाजूला असलेल्या डोंगरावरून दरडी कोसळल्याने सहा मजली इमारतीच्या भिंतीवर आघात झाला. सर्वाधिक नुकसान तिसऱ्या मजल्याचे झाले. येथे थांबलेल्या यात्रेकरूंचा यात अंत झाला. त्यांचे मृतदेह सापडले आहेत. अद्याप २५ जणांचा शोध सुरू आहे. ११ जखमींपैकी जणांची प्रकृती गंभीर आहे. दरडी कोसळल्या तेव्हा गुरुद्वारात हजार लोक होते. अनेकलोकांना वाचवण्यात यश : भूस्खलनानंतरतीन मोठ्या दरडी गुरुद्वारावर कोसळत होत्या. पहिल्या दरडीचा आघात सहाव्या मजल्यावर झाला. मात्र, हा मजला रिकामा होता. इतर मजले तत्काळ रिकामे करवून घेण्यात आले. त्यामुळे अनेक भाविक बचावले.
बस दुर्घटनेतील ३० अजूनही बेपत्ता
१६जुलै रोजी ४५ यात्रेकरू प्रवास करीत असलेली बस पार्वती नदीत कोसळली होती. काही मृतदेह सापडले. मात्र, पाऊस सुरू असल्याने नद्या दुथडी भरून वाहत होत्या. त्यामुळे ३० यात्रेकरूंचे मृतदेह अद्यापही सापडले नाहीत. हे सर्व यात्री गुरुद्वाराकडे जात होते.