आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मणिपूरचे मुख्यमंत्री सिंग दहशतवादी हल्ल्यातून वाचले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इम्फाळ- मणिपूरचे मुख्यमंत्री इबोबी सिंग हे सोमवारी दहशतवादी हल्ल्यातून थोडक्यात बचावले. उखरूल हेलिपॅडवर हेलिकॉप्टरमधून उतरत असताना संशयित दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला.

सीआयडी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री इबोबी सिंग हे हेलिकॉप्टरमधून उतरले. अधिकारी त्यांचे स्वागत करत असतानाच त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. प्रत्युत्तरात मणिपूर रायफल्सच्या जवानांनीही गोळीबार केला. या गोळीबारात एक जवान जखमी झाला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांना घेऊन हेलिकॉप्टर तत्काळ चिंगई येथे रवाना झाले. पण तेथे निदर्शने सुरू असल्यामुळे हेलिकॉप्टर उतरू शकले नाही. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व कार्यक्रम रद्द केले आणि ते राजधानी इम्फाळला परतले. तेथे त्यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक घेतली.

उखरूल जिल्ह्यातील हुनफुंग आणि चिंगई या गावांत मुख्यमंत्री इबोबी सिंग यांचे विविध कार्यक्रम होते. हुनफुंग येथे त्यांच्या हस्ते १०० खाटांच्या उखरूल जिल्हा रुग्णालयाचे तसेच वीज उपकेंद्राचे उद््घाटन होणार होते. हेलिपॅडहून हुनफुंगकडे जाणाऱ्या तीन किमी लांबीच्या रस्त्यावर नागरी संस्थांच्या संघटनांनी रास्ता रोको आंदोलन केले होते तसेच संचारबंदीचे आवाहन केले होते. निदर्शकांनी तेथे दोन वाहनांनाही आग लावली.
बातम्या आणखी आहेत...