आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manipur Earthquake: Rescue, Relief Work In Full Swing

मणिपूरमध्ये बचावकार्याला वेग, शाळा-कार्यालये ठेवली बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इम्फाळ- नवी दिल्ली- मणिपूरमध्ये सोमवारी ६.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्यानंतर व्यापक बचाव अभियानाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीने मंगळवारी भूकंपाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

भूकंपात राज्यातील जणांचा बळी गेला. अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे. आपत्ती व्यवस्थापन पथक गुवाहाटीत दाखल झाले आहे. पडझड झालेल्या इमारतींच्या ढिगाऱ्यांखाली लोकांचा शोध घेतला जात आहे. काही बचाव पथकांना भूकंपाचे केंद्र असलेल्या मणिपूरमधील तामेंगलोंग जिल्ह्यात पाठवण्यात आले आहे. काही चमूंना आसामच्या सिलचर येथे स्टँडबाय चमू म्हणून पाठवण्यात आले आहे. मणिपूरच्या राजधानीतील सर्व शैक्षणिक संस्था, सरकारी कार्यालये, खासगी आस्थापना मंगळवारी बंद ठेवण्यात आल्या होत्या. इम्फाळ येथील सचिवालय आणि ऐतिहासिक इमा मार्केट परिसरात भूकंपामुळे भेगा दिसून येत आहेत. काही शाळांची पडझड झाली आहे. सेनापती तामेंगलोंग जिल्ह्याच्या काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनच्या अभियंत्यांचा चमू वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी मणिपूरमध्ये कार्य करत आहे. डॉक्टरांचे पथकही पोहोचले आहे.