आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मणिपूर : 24 तासांत राजीनामा देणार मुख्यमंत्री इबोबी सिंह, बीरेन सिंह भाजपचे CM उमेदवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बीरेन सिंह आणि पीयूष गोयल. - Divya Marathi
मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बीरेन सिंह आणि पीयूष गोयल.
इंफाळ - भाजपने एन बीरेन सिंह यांना पक्षाच्या विधिमंडळ नेता म्हणून निवडले आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी ही माहिती दिली. बीरेन यांनी राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. 
 
मणिपूरच्या गव्हर्नर नजमा हेपतुल्ला यांनी काँग्रेसचे मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. नव्या सरकारच्या स्थापनेची प्रक्रिया पुढे जावी यासाठी असा आदेश देण्यात आला. विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. राज्यातील 60 जागांवर काँग्रेसला 28, भाजपला 21 आणि इतरांना 11 जागा मिळाल्या होत्या. भाजपने बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 31 आमदारांची यादी राज्यपालांकडे दिली असल्याचा दावा केला आहे. दरम्यान सुरुवातीला नकार दिल्यानंतर इबोबी यांनी 24 तासांत राजीनामा देणार असल्याचे म्हटले आहे. 

इबोबी सिंह यांचा राजीनामा देण्यास सुरुवातीला नकार 
- गव्हर्नर नजमा हेपतुल्ला यांनी सोमवारी मीडियाला सांगितले की, ओकराम इबोबी सिंह यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही. - मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याआधी इबोबी सिंह आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष टीएन हावकिप यांनी रविवारी रात्री राज्यपालांची भेट घेतली होती. त्यात गव्हर्नरने इबोबी यांना लगेचच राजीनामा देण्यास सांगितले होते. त्यानंतर इबोबी सिंह यांनी राजीनामा दिलेला नाही. 
- बहुमत असल्याचे सांगून इबोबी सिंह यांनी राजीनामा देण्यास नकार दिला. 

मणिपूर विधानसभेतील सद्यस्थिती 
- काँग्रेस 28 
- भाजप 21 
- एनपीएफ 4
- एनपीपी 4
- टीएमजी 1 
- एलजेपी 1 
- इतर 1

मुख्यमंत्र्यांचा राजीनामा गरजेचा का ?
- नियमांनुसार जोपर्यंत मुख्यमंत्री राजीनामा देत नाही, तोपर्यंत नवीन सरकारच्या सत्तास्थापनेची प्रक्रिया सुरू होत नाही. 
- काँग्रेसच्या मते 28 जागांसह काँग्रेस राज्यातील मोठा पक्ष आहे. त्यामुळे त्यांना आधी सत्ता स्थापनेची संधी मिळायला हवी. राज्यपालांबरोबरच्या बैठकीत इबोबी सिंह यांनी त्यांना 28 आमदारांबरोबरच नॅशनल पिपल्स पार्टी (एनपीपी) च्या चार आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. 
- मीडिया रिपोर्ट्सनुसार साध्या कागदावर एनपीपीच्या पाठिंब्याचा दावा केला आहे. त्याला लेटर ऑफ सपोर्ट मानण्यास राज्यपालांनी नकार दिली आहे. 
- दुसरीकडे भाजपचे 21 आमदार एनपीपी अध्यक्ष त्यांचे चार आमदार, एक काँग्रेस आमदार आणि एका एलजेपी आमदारासह टीएमएसच्या एका आमदाराने राज्यपालांची भेट घेतली आहे, असे सांगितले जात आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...