आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला दिन विशेष: महिला व्यावसायिकांची देशातील एकमेव बाजारपेठ, 484 वर्षे जुना इमा बाजार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मणिपूर- 484  वर्षे जुना इमा बाजार. देशातील केवळ महिलांद्वारे चालवली जाणारी एकमेव बाजारपेठ आहे. सर्व व्यवस्थापन महिलांकडे आहे.

इमा बाजाराचा शब्दश: अर्थ ‘मदर्स मार्केट’ असा होतो. 1533 मध्ये याची सुरुवात झाली. हा बाजार वसवण्यामागे एक किस्सा आहे. त्या वेळी पुरुषांना भातशेतीत काम करण्यास पाठवले जात असे. घरात फक्त महिलाच असत. हळूहळू या महिलांनी बाजाराचा व्याप वाढवला. येथे अंदाजे 3500 महिलांची दुकाने आहेत.

मासळीपासून महागड्या कपड्यांपर्यंत....
याठिकाणी मासळीपासून महागड्या कपड्यांपर्यंत वस्तू विक्रीसाठी असतात. जुन्या बाजारामध्ये आजही महिला उंच आसनावर बसून आपल्या वस्तूंची बोली लावतात. महत्त्वाचे म्हणजे इतर बाजारांप्रमाणे येथे स्पर्धा केली जात नाही. एखादी वस्तू आपल्या दुकानात उपलब्ध नसेल तर स्थानिक दुकानदार तुम्हाला दुसऱ्या महिलेच्या दुकानात पाठवण्याची तजवीज करते.

महिला दिनाच्या इतर विशेष स्टोरी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...
 
>आजच्याच दिवशी का साजरा होतो महिला दिन, जाणून घ्या इतिहास

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा... महिलांच्या मनातील तीन बाबी जाणून घ्या...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...