आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manjhi Decision Pasawan Caste Induct Mahadalit Category

बिहारमध्ये कुरघोडीचा खेळ, पासवान जातीस महादलित वर्गात आणण्याचा मांझींचा निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहारमध्ये मुख्यमंत्री जीतनराम मांझी व जदयू नेते नितीशकुमार यांच्यातील शह - काटशहाचे राजकारण सुरूच आहे. मांझी यांनी २० तारखेला बहुमत करण्याच्या प्रक्रियेची फारशी चिंता न करता निर्णयांचा धडाका लावला आहे. शनिवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांझी यांनी पासवान जात महादलित वर्गात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. दलित - महादलित जातीचा संघर्ष यामुळे संपुष्टात येईल, असा दावा मांझी यांनी केला आहे. यामुळे महादलितांना मिळाणारे सर्व लाभ व सवलती पासवान जातीला मिळणार आहेत.
याआधी बिहारमध्ये १८ अनुसूचित जाती महादलित वर्गात समाविष्ट करून त्यांना विशेष लाभ देण्याचा निर्णय नितीशकुमार यांनी मुख्यमंत्री असताना घेतला होता; परंतु त्यात पासवान जातीचा समावेश केलेला नव्हता. ही जात वगळून इतर सर्व जाती महादलित वर्गात आल्याने या जातीमध्ये नाराजी होती. मांझी यांनी या जातीला जवळ करण्याच्या व नितीश यांना शह देण्यासाठी ही जातही महादलित वर्गात समाविष्ट करून टाकली आहे. त्यांना महादलित वर्गाला मिळणारे सर्व लाभ देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. अनुसूचित जाती जमातीच्या कुटुंबातील लोकांना विकास मित्र बनवण्यात येईल, असे मांझी यांनी म्हटले आहे.
वाचा, दोन कोटींची ऑफर : भाजप