आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manjhi Removed From Party, Nitish Take MLAs Parade

मांझी पक्षातून बडतर्फ, नितीश यांची आमदारांची परेड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांच्याकडे बहुमताचा अभाव दिसत असला तरी त्यांची जिद्द कायम आहे. पक्षाच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकावल्यानंतर जदयूने सोमवारी मांझी यांना पक्षातून बडतर्फ केले. तरीही त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन बहुमत सिद्ध करण्याचा दावा केला.

राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी येताच नितीश यांनी १३० पाठीराख्या आमदारांनाच राजभवनात हजर केले. नंतर त्यांनी शरद यादव व लालूप्रसाद यादव यांच्याशी तासभर चर्चा केली. ‘आम्हाला ४८ तासांत बोलवा. सर्व आमदार बाहेर आहेत. आपण त्यांना बोलावू शकता,’ असे नितीश राज्यपालांना म्हणाले. त्यातच भाजपने ८७ आमदारांचा मांझींना पाठिंबा दिला. बजेट सत्र २० फेब्रुवारीपासून आहे.