पटना - राजीनाम्यासाठी वाढता दबाव पाहता बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी पक्षाबरोबरच बंडखोरीची भूमिका घेतली आहे. जदयूचे अध्यक्ष शरद यादव यांनी सात फेब्रुरुवारीला बोलावलेली विधिमंडळ पक्षाची बैठक बैकायदेशीर असल्याचे सांगत बैठकीला जाण्यास त्यांनी नकार दिला आहे.
फाइल फोटो : बैठकीदरम्यान जीतन राम मांझी व इतर नेते.विधिमंडळ पक्षाचा नेता मी आहे त्यामुळे बैठक बोलावण्याचा अधिकार मला आहे, असे मांझी यांचे म्हणणे आहे. त्यांनी 20 फेब्रुवारीला बैठक बोलावली आहे. राजीनाम्याच्या बातम्या खोट्या असल्याचेही मांझी म्हणाले. दरम्यान, जदयूने मुख्यमंत्र्यांवर कारवाईची धमकी दिली आहे. तर मांझी यांचाही प्लॅन बी तयार आहे.
जदयू अध्यक्ष शरद यादव यांनी राजीनामा देण्यास सांगितले नसल्याचे मांझी म्हणत आहे. पण जदयू पक्षनेतृत्वाला आता मुख्यमंत्रीपदी मांझी नको असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळेच मांझी यांनीही प्लॅन बी अंमलात आणण्याची तयारी सुरू केली आहे. सुत्रांच्या मते मांझी हे शक्य तेवढे जास्तीत जास्त मुख्यमंत्रीपदावर टिकण्याचा प्रयत्न करतील. जेव्हा ते अशक्य होईल, तेव्हा ते प्लॅन बी वापरतील.
असा आहे प्लॅन बी
मांझी यांच्या नीकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार विधानसभेच्या पुढच्या अधिवेशनापर्यंत मांझी यांना मुख्यमंत्रीपदी राहायचे आहे. बिहार विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारीला सुरू होणार आहे. या दरम्यान मांझी यांना राजीनामा द्यावा लागला कर प्लॅन बी ची अंमलबजावणी सुरू होईल. त्यानुसार मांझी आणि त्यांच्या गटातील मंत्री आमदारांनी (एकूण 32) ठरवले आहे की, जर जदयू आणि आरजेडी एकत्र आले तर सर्व नव्या राहतील. पण त्याठिकाणी राहूनही संख्याबळाच्या जोरावर हा गट विधानसभा निवडणुकांपूर्वी भाजपबरोबर आघाडी करण्याचा प्रयत्न करेल. त्यातही अपयश आले आणि नितीश, लालू यांनीही त्यांना महतत्व दिले नाही, तर ते सर्व इथर राजकीय पक्षांबरोबर मिळून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करतील.
मुलाच्या हाती देऊ शकतात कारभार
या सर्व शक्यता असून अद्याप कोणत्याही परिस्थितीत मांझी यांची भूमिका निश्चित झालेली नाही. मांझी गटातील सुत्रांच्या मते नव्या परिस्थितींमध्ये मांझी या गटाचे ज्येष्ठ नेते असतील पण सक्रिय नेतृत्वाची जबाबदारी ते मुलगा संतोष सुमन याच्याकडे देतील.
भाजपची प्रतिक्रिया
भाजप नेते नंद किशोर यादव मांझी गटाकडून मिळणाऱ्या बातम्यांबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले की, "एनडीएमध्ये कोणाचा समावेश करायचा याचा निर्णय वेळेवर घेतला जाईल असेही ते म्हणाले.