आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्र्यांकडून खिल्ली: नवज्योतसिंग सिद्धू म्हणजे 'विकाऊ माल’ : मजिठिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृतसर- भाजपचे माजी खासदार नवज्योतसिंग सिद्धू कधी आम आदमी पार्टी, तर कधी काँग्रेस, तर कधी इतर कोणत्या पक्षात जाणार असल्याच्या वावड्या उठत असतात. यासंदर्भात विक्रमसिंग मजिठिया या मंत्र्यांनी नवज्योतसिंग सिद्धू 'विकाऊ माल’ असल्याचे सांगत त्यांनी खिल्ली उडवली आहे. सिद्धूच्या राजकीय सौदेबाजीवर बोलताना त्यांनी सांगितले, नवज्योत सिद्धू यांचा खरा चेहरा जनतेसमोर आला अाहे.

येत्या १ नोव्हेंबर रोजी पंजाब राज्याच्या ५० व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी मजीठिया अमृतसरमध्ये आले होते. मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास केंद्रीय मंत्री अरुण जेटली तसेच भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
मजिठिया यांनी सांगितले, दिवसा रणजित अॅव्हेन्यू मैदानावर मोठा मेळावा होणार आहे. संध्याकाळी दरबार साहिब येथे लाइट अँड साउंड कार्यक्रम होईल.

टीव्हीवर तमाशा करणाऱ्यांचाच तमाशा बनला : डीजीपीसी
चंदिगड- दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक कमिटीने नवज्योतसिंग सिद्धू हा “विकाऊ माल’ असल्याचे म्हटले. कमिटीने म्हटले : ते कधी आपशी हातमिळवणी करतात तर कधी काँग्रेससोबत जातात. आता अपना पंजाब पार्टीतही जाऊ शकतात. ही आघाडी सिद्धूचा लिलाव करू शकते. कमिटीचे महासचिव मनजिंद्र सिंग सिरसा यांनी म्हटले : सिद्धू या आघाडीत सर्वाधिक पैसा जो देईल त्यासोबत ते जातील. तसेच सिद्धूच्या पत्नीला उपमुख्यमंत्रिपद हवे आहे, ती सिद्धूची एकमेव अट आहे. निवडणुकीची घोषणा होण्याआधी सिद्धू दांपत्य कॅबिनेट प्रवेशाच्या तयारीला लागले आहेत. सिद्धूच्या राजकीय सौदेबाजीला कंटाळून बैन्स बंधूंना पक्ष काढावा लागला. अाता परगटसिंग अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. सिद्धूला कोणत्याही पक्षाची विचारधारा किंवा कार्यक्रमाविषयी काही देणेघेणे नाही. टेलिव्हिजनवर रोज तमाशा करणारा सिद्धू आता स्वत:च एक तमाशा बनला आहे.
बातम्या आणखी आहेत...